• Wed. Jul 1st, 2026

    यूपीएससी परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या डॉ. कश्मिरा संखे यांची दिलखुलास कार्यक्रमात २९ आणि ३० मे रोजी मुलाखत

    ByMH LIVE NEWS

    May 26, 2023
    यूपीएससी परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या डॉ. कश्मिरा संखे यांची दिलखुलास कार्यक्रमात २९ आणि ३० मे रोजी मुलाखत

    मुंबई, दि. 26 : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत यावर्षी देशासह राज्यातील मुलींनी आपली विजयी पताका कायम ठेवली आहे. राज्यातील उमेदवारांनी यंदाही या परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. ठाणे येथील डॉ. कश्मिरा संखे यांनी राज्यात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. डॉ. कश्मिरा संखे यांनी त्यांच्या या प्रवासाबद्दल ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून सविस्तर माहिती दिली आहे. डॉ. कश्मिरा संखे या महाराष्ट्रातून पहिल्या, तर देशातून 25 व्या क्रमांकावर उत्तीर्ण झाल्या आहेत.

    माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत, सोमवार दि. 29, आणि मंगळवार दि. 30 मे, 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed