• Mon. Nov 18th, 2024

    मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षातून गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य – विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे

    ByMH LIVE NEWS

    May 24, 2023
    मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षातून गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य – विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे

    मुंबई, दि. 24: राज्य शासनामार्फत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे काम गतीने सुरू आहे. या कक्षाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य दिले जाते. या कक्षाच्या कार्यपद्धती बाबतची माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांनी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमाच्या माध्यमातून दिली आहे.

    राज्य शासनामार्फत जनतेला चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्यातील गरजू रुग्णांना आर्थिक मदत उपलब्ध व्हावी यासाठी मंत्रालयात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष सुरू आहे. या कक्षाच्या माध्यमातून रुग्णांना कशा प्रकारे लाभ दिला जातो, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीसाठीची अर्ज प्रक्रिया, तसेच कोणत्या आजारासाठी कशा स्वरूपात आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाते, याबाबत या कक्षाचे विशेष कार्य अधिकारी श्री. चिवटे यांनी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून सविस्तर माहिती दिली आहे.

    माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत गुरूवार, दि. 25 मे, 2023 रोजी सायं 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल. ही मुलाखत ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र हुंजे यांनी घेतली आहे.

    महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ही मुलाखत पाहता येईल.

    ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

    फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

    यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

    0000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed