महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने ५ मार्च २०२३ रोजी पाठवलेल्या कारणे दाखवा नोटीसवर ९ एप्रिल २०२३ रोजी आम्हाला मिळालेल्या उत्तरावर समितीने चर्चा केली आहे. तुमची पक्षविरोधी वागणूक आणि सार्वजनिक विधाने याबाबत समितीला तुमचे उत्तर समाधानकारक वाटत नाही. त्यामुळे या प्रकरणात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या घटनेचे अनुशासनात्मक नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे लागू आहेत.”
या आदेशाद्वारे पक्षविरोधी कारवायांमुळे पुढील सहा वर्षांसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून आपली तत्काळ हकालपट्टी करण्यात आली आहे, असेही चव्हाण म्हणाले.
सावनेरमधून देशमुखांना भाजपची उमेदवारी?
नागपूरजवळील सावनेर विधानसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा आहे. त्यामुळे देशमुखांशी गाठ बांधून ही जागा काबीज करण्याचा फडणवीसांचा प्रयत्न आहे. येथून देशमुख यांना उमेदवारी देण्याचा भाजपचा विचार आहे. सध्या ही जागा काँग्रेसचे सुनील केदार यांच्या ताब्यात आहे. खुद्द देशमुख यांचाही या मतदारसंघावर डोळा आहे.
सावनेर हा आशीष देशमुख यांचे वडील रणजित देशमुख यांचा मतदारसंघ होता. मात्र १९९६ मध्ये सुनील केदार यांनी अपक्ष उमेदवार म्हणून रणजित देशमुख यांचा पराभव केला. त्यामुळे या मतदारसंघातील देशमुखांचे वर्चस्व संपुष्टात आले. आता आशीष देशमुख पुन्हा भाजपच्या पाठिंब्याने ही जागा काबीज करण्याच्या प्रयत्नात आहेत.