मिळालेल्या माहितीनुसार, पुणे – नगर महार्मागावरून ही बस प्रवाशांना घेऊन अष्टविनायक दर्शनाला घेऊन निघाली होती. पुण्याकडून प्रवाशांना घेऊन श्रीक्षेत्र रांजणगाव येथे निघाली होती. मात्र, वाघोलीच्या पुढे असणाऱ्या लोणीकंद येथील पुलगाव गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.
या अपघातात ४ ते ५ प्रवासी जखमी झाले असून त्यांना जवळच्या लोहगाव, वाघोली आणि शिक्रापूर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात किती प्रवासी होते याची माहिती अद्याप समोर आली नसली, तरी मोठी दुर्घटना टळली आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून जखमींना रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. जखमींची नावे अद्याप समजलेली नाहीत. घटनास्थळी क्रेन दाखल झालं असून बसला सरळ करण्याचे काम सुरू आहे. पुढील कारवाई करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
पुणे – नगर महामार्गावर अपघातांची संख्या वाढत आहे. वाहनांचा अतीवेग यासाठी कारणीभूत असल्याचे अनेकदा समोर आलं आहे. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवणे तेवढेच गरजेचं देखील आहे. वाहन चालकांनी याबाबत दक्षता घेणे गरजेचे असून यामुळे अनेकांचे जीव वाचण्यास मदत होणार आहे. लोणीकंद परिसरात अपघाताचे प्रमाण वाढत असून प्रशासनाने त्यावर उपाययोजना करणे देखील महत्वाचं आहे.