गौतमीच्या कार्यक्रमांवर रोज गुन्हा दाखल होणे गरजेचे…
नृत्यांगना गौतमी पाटीलचे कार्यक्रम महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यात संपन्न होत आहेत. एखाद्या मैदानात हे कार्यक्रम होत आहेत. सार्वजनिक ठिकाणी सर्रास अश्लील चाळे सुरू आहेत. असभ्य चाळे करणे, युवक मंडळीच्या कानी पडतील असे घाणेरडे शब्द वापरणे, हावभाव करणे हे सर्व कायदेशीर कलमान्वये गुन्हे आहेत. असे प्रकार सर्वसामान्य जनतेसमोर सार्वजनिक ठिकाणी केले जात असतील तर गौतमीच्या रोज होणाऱ्या कार्यक्रमांवर गुन्हे दाखल होणे गरजेचे आहे. कपडे घालण्यामध्ये कायद्याने बंधनं लादली आहेत. कुणाला भुलवण्यासाठी, पैसे मिळवण्यासाठी वेगवेगळे इशारे करणं, अंगविक्षेप करणं, हावभाव करणे हा कायद्यान्वये गुन्हा आहे अशी माहिती माजी पोलीस अधिकारी भाऊसाहेब आंधळकर यांनी माहिती दिली.
महाराष्ट्र शासनाने दखल घेत बंधनं घातली पाहिजे…
गौतमीच्या कार्यक्रमात येणारे युवक या ठिकाणी जे व्हिडिओ शेअर करत असतात ते त्यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. परंतु जरा जपून करा असा सल्ला आंधळकर यांनी दिला आहे. महाराष्ट्र राज्यात हे असंच चालू राहिलं तर कायदा सुव्यवस्था निर्माण होईल. काही वेळेला दंगल घडेल, हाणामाऱ्या-मारामाऱ्या, खुनाचे प्रयत्न किंवा खून होतील. अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे. ३४ वर्ष पोलीस खात्यात आम्ही सेवा केलेली आहे. याप्रमाणे १०१% गुन्हे होत आहेत. रोज राडे होत आहेत. त्यामुळे प्रत्येक कार्यक्रम हा गुन्हा होत आहे. महाराष्ट्र पोलीस दलाने आणि महाराष्ट्र शासनाने याची नोंद घ्यावी अशी विनंती आंधळालकर यांनी केली आहे.