• Mon. Nov 25th, 2024
    नापास होण्याच्या भितीने विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल, लहान भावाने पाहिले, बसला धक्का

    नागपूर : अनुत्तीर्ण होण्याच्या भीतीने विद्यार्थिनीने आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना हुडकेश्वर पोलिस स्टेशनह द्दीतील गोरगोटीनगर परिसरातील तुळजाईनगर येथे घडली. एकता सागर जिभकाटे (वय १५ रा. तुळजाईनगर),असे मृत विद्यार्थिनीचे नाव नाव आहे.गेल्या काही दिवसांपासून होती तणावात

    एकताने दहावीची परीक्षा दिली होती. काही दिवसांनी परीक्षेचा निकाल लागणार होता. अनुत्तीर्ण होण्याच्या भीतीने गेल्या काही दिवसांपासून ती तणावात राहायला लागली. दरम्यान, शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास तिने पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला आणि आपले जीवन संपवले.

    Chhatrapati Sambhajinagar News: दुचाकीस्वाराने सिग्नल तोडला; पोलिसाने लाथा बुक्क्यांनी तुडवला, व्हिडीओ व्हायरल
    लहान भावाने बहिणीची आत्महत्या पाहिली

    एकता हिने गळफास घेतल्यानंतर तितक्यात तिचा लहान भाऊ तेथे आला. त्याने एकताने गळफास घेतला असल्याचे दिसले. त्याला मोठा धक्का बसला. समोरचे दृश्य पाहून त्याने आरडाओरड केली. एकताच्या भावाची आरडाओरड पाहून तत्काळ तेथे शेजारी जमा झाले. त्यानंतर तेथील एका नागरिकाने या आत्महत्येच्या घटनेची हुडकेश्वर पोलिसांना माहिती दिली.

    ब्रँडेड कपडे घालून मुलींना आकर्षित करायचा, नंतर करायचा धक्कादायक काम, शेवटी व्हायचे तेच झाले
    या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. काही वेळाने एकता हिचे आई-वडिलही घरी आले. पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह मेडिकल कॉलेज हॉस्पिटलकडे रवाना केला. याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

    आपल्या मुलीने आत्महत्याचे केल्याचे पाहून एकताच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला. एकताचे वडील खासगी काम करतात तर आई एका दुकानात काम करते.
    धक्कादायक! डोंबिवलीकरांसाठी चिंताजनक, दीड वर्षात ९३ अल्पवयीन मुली गायब, कारणेही समजली

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *