• Sat. Sep 21st, 2024
ग्रामदैवत सिद्धेश्ववर महाराजांच्या मंदिरात फलक झळकले; मंदिर प्रशासनाची एकच धावपळ

सोलापूर: सोलापूरच्या ग्रामदैवत श्री सिद्धेश्ववर महाराजांच्या मंदिराला सोलापूरसह ,महाराष्ट्र ,आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटकातील भाविक दर्शनासाठी येतात. दोन दिवसांपासून महाराष्ट्र राज्यात प्रसिध्द अशा मंदिरासमोर तोकडे कपडे घालणाऱ्या महिला व पुरुष भाविकांना प्रवेश नाही, असे फलक लावण्यात आले होते. महाराष्ट्र राज्याची कुलस्वामिनी श्री क्षेत्र तुळजाभवानी मंदिरात देखील असे फलक लावण्यात आले होते. या फलकाचे फोटो सोशल मीडियावर राज्यभर पसरले होते. मंदिर प्रशासनाने याबाबत स्पष्टपणे नकार देत हे फलक आम्ही लावले नाही, असा खुलासा केला होता. तसाच प्रकार सोलापूरच्या सिद्धेश्ववर मंदिरात पहावयास मिळाला.आम्ही तसा आदेश दिलाच नाही…

ग्रामदैवत सिद्धेश्ववर महाराज मंदिरा समोर शुक्रवारी दुपारी तोकडे कपडे, बरमुडा, हाफ पॅन्ट घालून प्रवेश करू नये. भारतीय संस्कृतीचे भान ठेवावे, असे फलक झळकले. हे फलक सोलापुरात सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले. याबाबत मंदिर समिती म्हणजेच पंच कमिटीचे विश्वस्त धर्मराज काडादी यांना अधिक माहिती विचारली असता, त्यांनी हे फलक मंदिर समितीच्या वतीने लावण्यात आले नाही, असे स्पष्टपणे उत्तर दिले. तसा आदेश देखील मंदिर समितीने दिला नाही, असे धर्मराज काडादी यांनी माहिती दिली. त्याचबरोबर मंदिरासमोरील सर्व फलक मंदिरातील कर्मचाऱ्यांनी काढून टाकले आहे.

IPL 2023 Playoff Scenarios : ७२ तासात होणार ५ हायहोल्टेज लढती; ‘ते’ तिघे कोण असणार? असे आहे प्लेऑफ संपूर्ण समीकरण

सोलापुरातील श्री सिद्धेश्ववर महाराजांच्या मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. सिद्धेश्ववर भक्त महेश धाराशिवकर यांनी भारतीय संस्कृती फलकाचे स्वागत केले. भारताला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे झाली. स्वातंत्र्य मिळालं तर भाविकांनी स्वैराचार करू नये. तोकडे कपडे घालून मंदिरात येऊ नये. देव आपल्याला पाहण्यासाठी बसलेले नाही, असे महेश धाराशिवकर यांनी माहिती दिली.

मोदी सरकारमुळे भारताची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली; रवींद्र धंगेकरांची टीका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed