• Sun. Nov 24th, 2024

    ‘आदिपुरुष’बद्दल शरद केळकरने व्यक्त केलेलं मत चर्चेत

    ByMH LIVE NEWS

    May 19, 2023
    ‘आदिपुरुष’बद्दल शरद केळकरने व्यक्त केलेलं मत चर्चेत

    या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनसाठी प्रभास साकारत असलेल्या श्रीरामांच्या भूमिकेला मराठमोळ्या शरद केळकरने आवाज दिला आहे.

    मुंबई -ललिता पिल्लेवार

    अभिनेता प्रभास सध्या ‘आदिपुरुष’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. यामध्ये प्रभास श्री रामाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात प्रभासला श्री रामाच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. हा ट्रेलर सुपरहिट ठरला आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनसाठी प्रभास साकारत असलेल्या श्रीरामांच्या भूमिकेला मराठमोळ्या शरद केळकरने आवाज दिला आहे. तर आता या चित्रपटाबद्दलचं त्याचं मत त्याने व्यक्त केलं आहे.शरद केळकरने याआधी प्रभासच्या ‘बाहुबली’ या चित्रपटात त्याने साकारलेल्या भूमिकेच्या हिंदी व्हर्जनसाठी डबिंग केलं होतं. तर ‘बाहुबली’ नंतर पुन्हा एकदा प्रभासच्या भूमिकेसाठी प्रेक्षकांना शरद केळकरचा आवाज ऐकू येणार आहे. शरद केळकर ‘आदिपुरुष’च्या हिंदी व्हर्जनसाठी डबिंग करणार हे कळल्यावर प्रेक्षक खूप उत्सुक होते. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये त्याचा आवाज ऐकून सर्व जण त्याचं भरभरून कौतुक करत आहे. या चित्रपटासाठी डबिंग करण्याचा त्याचा अनुभव कसा होता हे आता त्याने शेअर केलं आहे.

    सिद्धार्थ कान्ननला दिलेल्या मुलाखतीत शरद म्हणाला, “मी या चित्रपटाचा फायनल कट अजून पाहिलेला नाही. पण मी हा चित्रपट जितका पाहिला आहे तितका मला खूप आवडला. डबिंगबद्दलही कोणालाही काहीही तक्रार नाही. या चित्रपटाबद्दल मला फार माहिती नाही पण चित्रपटाची कथा, त्याची मांडणी या चित्रपटाच्या निर्मितीची प्रक्रिया ही उत्कृष्ट आहे. या चित्रपटाच्या डबिंगनंतर प्रभासने मला मिठी मारली आणि माझ्या कामाचं त्याने कौतुक केलं, ही मला मिळालेली सगळ्यात मोठी पावती आहे, असं मी समजतो.”‘आदिपुरुष’  हा चित्रपट रामायणावर आधारित आहे.  या चित्रपटात श्रीरामांची भूमिका प्रभास साकारत आहे, सीतेची भूमिका क्रिती सेनॉन साकारत आहे, रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान दिसणार आहे, तर मराठमोळा देवदत्त नागे या चित्रपटामध्ये हनुमानाची भूमिका साकारताना दिसणार आहे. ओम राऊत दिग्दर्शित हा चित्रपट १६ जून रोजी प्रदर्शित होईल.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed