• Wed. Mar 11th, 2026

     घटस्फोटित हिरोचं अभिनेत्रीला चुंबन

    ByMH LIVE NEWS

    Feb 28, 2026
     घटस्फोटित हिरोचं अभिनेत्रीला चुंबन

    ‘बिग बॉस मराठी’चा (Bigg Boss Marathi) सध्या 6 वा सीझन सुरू असून हा शो चांगलाच चर्चेत आहे. गेम जसजसा पुढे जात आहे, तसतशी नाती वेगाने बदलताना दिसत आहे. जे जुने शत्रु होते, ते आता मित्र बनताना दिसत असून इमोनशन टेन्शनही खूप वाढल्याचं दिसतंय. सध्या या शोच्या लेटेस्ट प्रोमोने तर एकदम खळबळच उडवली आहे. त्यात एका टास्कमध्ये (Rakesh Bapat) आणि तन्वी कोलते (Tanvi Kolte) यांचा रोमँटिक क्षण दाखवण्यात आला. काँटा गँगमध्ये असलेल्या राकेश आणि तन्वीची मैत्री चांगलीच वाढली असून त्याचंच प्रतिबिंब टास्कमध्येही दिसलं. मात्र यामुळे घरात वाईल्ड कार्ड म्हणून आलेली राखी सावंत काही फारशी खुश नसून, तिच्या हंगाम्यामुळे सगळेच हैराण झाले.

    तन्वी-राकेशचा डान्स

    घरात नुकताच एक टास्क झाला. आणि त्याच टास्कमध्ये तन्वी कोलते आणि राकेश बापट यांनी रोमँटिक डान्स केला. नव्या प्रोमोमध्ये ते अगदी स्पष्ट दिसलं. त्यांच्या केमिस्ट्रीने अनेकांच्या भुवया उंचावल्या, पण त्याच टास्कमध्ये राकेशच्या एका कृतीमुळे तर सगळेच हैराण झाले. परफॉर्मन्सदरम्यान राकेश जे वागला ते पाहून राखी सावंत चांगलीच भडकली. आणि ते पाहून राकेशने तिला डिवचण्यासाठी असं काही केलं, ज्याने सगळ्यांनाच धक्का बसला.

    डान्स करतानाच राकेशने तन्वीच्या गालावर चक्क किस केलं, त्यामुळे घरातले सगळे सदस्य चक्रावलेच. राखीही ते दृश्य पाहून भडकली, अख्ख्या एपिसोडचा हा टर्निंग पॉईंट होता. राकेश तन्वीची केमिस्ट्री पाहून सदस्य हैराण झाले, पण काही जण शांत राहिले. मात्र हे पाहून शांत बसेल ती राखी सावंत कसली, तिने थेट गोंधळ माजवयला सुरूवात केली.

    या शोमध्ये राखी ही राकेशशी इमोशनली अटॅच झालेली दिसली. पण टास्कदरम्यान राकेश-तन्वीची जवळीक ती सहन करू शकली नाही. तिने घरात हैदोस घातला एवढंच नव्हे तर रागाच्या भरात तिने स्वत:च्याच केसांवर कात्री चालवली, राखीने तिचेच केस कापले. ते पाहून राकेश, तन्वीने तिला रोखण्यासाठी धाव घेतली, पण राखी कोणाचंच ऐकत नव्हती. संतापाने थरथरत होती, रडतही होती.https://www.instagram.com/reel/DVP-ND7iJDn/embed/captioned/?cr=1&v=14&wp=540&rd=https%3A%2F%2Fwww.tv9marathi.com&rp=%2Fentertainment%2Fbigg-boss-marathi-season-6-rakhi-sawant-angry-after-raqesh-bapat-kissed-tanvi-kolte-during-dance-1615948.html#%7B%22ci%22%3A0%2C%22os%22%3A162022.60000000056%2C%22ls%22%3A161161.90000000037%2C%22le%22%3A162014.90000000037%7D

    View this post on Instagram

    A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

    प्रेक्षकांनी घेतली शाळा

    मात्र राकेशचं कृत्य पाहून घरातले सदस्य आणि शोचे चाहते, प्रेक्षक सगळेच चक्रावले. राकेशनं तन्वीला किस केल्यानंतर नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं आहे. हा फक्त ड्रामा असल्याचं अनेकांनी म्हटलं. बहीण भाऊ म्हणत म्हणत 😂😂 असे वागतात big boss साठी काय काय करतील,अशी कमेंट करत एकाने यावर तोंडसुख घेतलं. बहीण भाऊ बोलत ही काटा गँग जाम चालू काम करत असतात अशी कमेंटही आणखी एका युजरने केली आहे. राकेश हा बिग बॉस हाऊस चा इम्रान हाश्मी आहे, अशा शब्दांत आणखी एक युजरने त्याला खडेबोल सुनावले आहेत. पण एका प्रेक्षकाने राखीलाच सुनावलंय. राखीने हेअरकट केला असता, तर खूप छान झाले असते, खोटे केस कापून काही उपयोग नाही.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed