दोन दिवसांपर्यंत या मार्गाचं काम सुरू होतं. काम पूर्ण झाल्यावर दोन दिवसांपूर्वीच हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आणि या खुला झालेल्या महामार्गावरून पंढरपूरकडे जाण्याचा निर्णय पंढरपूरला निघालेल्या पोवार कुटुंबाच्या गाडीच्या चालकाने देखील घेतला. मात्र ज्या ठिकाणाहून हा बायपास मार्ग सुरू होतो, तेथून काही अंतर गेल्यावर पोवार कुटुंबांच्या गाडीला भीषण अपघात झाला.
चुकीच्या दिशेने समोरून येणाऱ्या विटीने भरलेल्या ट्रॅक्टरला जाऊन पोवार कुटुंबांची गाडी धडकली. ज्यामध्ये गाडीमध्ये असणारे पोवार कुटुंबातील पती-पत्नी,मुलगा आणि सासू व चुलत सासरे,असे पाच जण ठार झाले आहेत.
जयवंत दत्तात्रय पोवार (वय ४५) ,स्नेहल जयवंत पोवार (वय ४०),सोहम जयवंत पोवार (वय-१२), लक्ष्मण शंकर शिंदे (वय-७०), कमल श्रीकांत शिंदे (वय ५६) आणि ड्रायव्हर उमेश उदय शर्मा (वय २२)अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. तर साक्षी जयवंत पोवार (वय १५) आणि श्रावणी जयवंत पोवार (वय-१७) या दोघी बहिणी सुदैवाने या भीषण अपघातातून बचावल्या आहेत. त्यांच्यावर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच मिरज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या अपघात प्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यामध्ये ट्रॅक्टर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून याप्रकरणी अविनाश कोळी या चालकास अटक करण्यात आली आहे.
