मिरज बायपास असणाऱ्या रत्नागिरी- नागपूर माहमार्गावरील वड्डी गावाच्या हद्दीत बोलेरो गाडी पोहोचली असता ,राँग साईडने विटांनी भरलेला ट्रॅक्टर अचानक समोर आला. तर, भरधाव वेगात असणारी बोलेरो गाडी समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरवर जाऊन आदळली,ज्यामध्ये गाडीचा चक्काचूर होऊन ७ जण जागीच ठार झाले आहेत,तर १ तरुणी गंभीर जखमी झाली आहे.
जखमींना तातडीने मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून घटनास्थळी मिरज पोलीस दाखल झाले असून मृतांची ओळख पटवण्याचे काम करत आहेत.
पंढरपूरला जाताना अपघात
सांगली जिल्ह्यातून जाणाऱ्या रत्नागिरी नागपूर महामार्गावर मिरज जवळील वड्डी गावाजवळ हा भीषण अपघात झाला आहे. बोलेरो आणि ट्रॅक्टरच्या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. कोल्हापूरहून पंढरपूरला जाणाऱ्या कुटुंबावर काळानं घाला घातला आहे. विटानं भरलेला ट्रॅक्टर चुकीच्या दिशेनं आल्यानं दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. या घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला असून १ जण जखमी झाला आहे.
बोलेरो गाडी मधील प्रवासी सर्वजण कोल्हापूरहून पंढरपूरच्या दिशेने चालले होते. मिरज जवळील वड्डी गावाजवळील हायवेवर भीषण अपघात झाला. चुकीच्या साईडहून विटांनी भरलेल्या ट्रॅक्टरनं बोलेरोला धडक दिली. ट्रॅक्टर आणि बोलेरो गाडीच्या भीषण अपघातात ७ जण ठार झाले असून मिरजेच्या वड्डी येथील महामार्गावर हा अपघात घडला.
रस्ता सुरु झाला अन् पहिल्याच दिवशी अपघात
या मार्गावरुन वाहतूक सुरु झाल्याचा आजचा पहिलाच दिवस होता. महामार्गावर दिशादर्शक फलक लावले नसल्यानं हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
