• Sun. Sep 22nd, 2024

अनुसूचित जातीतील उद्योजक आणि व्यवसायिकांनी अनुदान आणि बीजभांडवलासाठी अर्ज करण्याचे आवाहन

ByMH LIVE NEWS

May 15, 2023
अनुसूचित जातीतील उद्योजक आणि व्यवसायिकांनी अनुदान आणि बीजभांडवलासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. १५ : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत अनुसूचित जातीतील १२ पोटजातीतील उद्योजक आणि व्यवसायिकांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या अनुदान आणि बीजभांडवलासाठीच्या योजनेंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन महामंडळाच्या मुंबई उपनगर- शहर जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

अनुसूचित जातीतील मांग/ मातंग/मिनी,मादींग/दानखणी मांग/मांग महाशी/मदारी/राधेमांग/मांग गारुडी/ मांग गारोडी/ मदारी/मादगी या १२ पोटजातीतील समाजाच्या सामाजिक व आर्थिक विकासाकरिता स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने वैयक्तिक अर्जदारांनी उद्योग/व्यवसाय करण्यासाठी महामंडळाच्या २० कलमी कार्यक्रमानुसार सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी मुंबई उपनगर जिल्हा कार्यालयाकरिता अनुदान योजनेंतर्गत भौतिक उद्दिष्ट ५०, बीजभांडवल योजनेंतर्गत भौतिक उद्दिष्ट ३० व मुंबई शहर जिल्हा कार्यालयाकरिता अनुदान योजनेंतर्गत भौतिक उद्दिष्ट ५०, बीजभांडवल योजनेतंर्गत भौतिक उद्दिष्ट ३० चे प्राप्त असून अर्ज करण्यासाठी जिल्हा कार्यालय, मुंबई उपनगर शहर, गृहनिर्माण भवन, कलानगर, तळमजला, रुम नं. ३३, बांद्रा (पू), मुंबई- ४०००५१ या पत्त्यावर संपर्क करावा, असे जिल्हा व्यवस्थापक यांनी आवाहन केले आहे.

अर्जदार मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील असावा, महाराष्ट्रातील रहिवासी असावा, वय १८ ते ५० वर्ष असावे, यापूर्वी महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा, अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रु.३ लाखांपेक्षा जास्त नसावे, एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ घेता येईल,अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव/प्रशिक्षित असावा. अर्जदारास महामंडळाच्या प्रचलित नियमानुसार व्यवसायास अनुरूप असलेली आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्र/करारपत्रे/कर्ज मागणी अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, मुंबई शहर, उपनगर यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.

००००

संध्या गरवारे/विसंअ

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed