• Sat. Sep 21st, 2024

मुंबईहून पुण्याला जाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; वाशी-पुणे शिवनेरी बससेवेबद्दल धक्कादायक अपडेट,जाणून घ्या

मुंबईहून पुण्याला जाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; वाशी-पुणे शिवनेरी बससेवेबद्दल धक्कादायक अपडेट,जाणून घ्या

मुंबई : सवलतींच्या योजनांमुळे एसटी बसगाड्यांच्या प्रवाशांची संख्या वाढली असून गाड्यांअभावी प्रवाशांना एसटी आगारांत ताटकळत उभे राहावे लागत आहे. अशा स्थितीत प्रवासी प्रतिसाद नसल्याचे कारण देत वाशी-पुणे शिवनेरी सेवा बंद करण्याचा निर्णय एसटी महामंडळाच्या मुंबई विभागाने घेतला आहे.

ठाणे-दादरवरून पुणे येथे जाणाऱ्या शिवनेरी प्रवाशांनी भरून येतात. यामुळे नवी मुंबईतील प्रवाशांना आसन मिळत नाही. नवी मुंबईकरांच्या सुविधेसाठी वाशी-स्वारगेट (पुणे) शिवनेरी सुरू करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला होता. ८ मे रोजी वाशीवरून शिवनेरी सुरू करण्यात आली. मात्र, मुंबई विभागाने प्रवाशांना या गाडीची माहिती ९ मे रोजी दिली. एखाद्या मार्गावर शिवनेरीसारखी सेवा सुरू करण्यापूर्वी त्याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे आवश्यक असताना महामंडळाकडून कोणतेही प्रयत्न केले गेले नाहीत.

धोनीजवळ गावस्कर धावत आले आणि जिंकली सर्वांची मनं, व्हिडिओमध्ये नेमकं काय घडलं पाहा…
गाडी सुरू झाल्याच्या एक-दोन दिवसांनंतर प्रवाशांना माहिती देण्यात आली. त्यानंतर अवघ्या चारच दिवसांत गाडी रिकामी धावत असल्याचे सांगत सेवा बंद करण्यात आली. मुळात नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या गाड्यांचा प्रचार-प्रसार योग्य पद्धतीने होत नाही. त्यातच प्रवाशांपर्यंत माहिती पोहोचण्यापूर्वीच गाडी बंद झाल्याने मुंबई विभागाच्या कामगिरीवर एसटी प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. ठाणे-पुणे मार्गावर ई-शिवनेरी सुरू झाली आहे. आठ वर्षांवरील शिवनेरी मुंबई बाहेर चालवण्याचे धोरण आहे. यामुळे वाशी-स्वारगेट मार्गावर डिझेलवरील शिवनेरी सुरू करण्यात आली होती. मात्र, प्रवासी प्रतिसाद नसल्याने या मार्गावरील सेवा बंद करण्यात आल्या असून पुणे विभागाकडे शिवनेरी गाड्या देण्यात आल्या आहेत, असे स्पष्टीकरण महामंडळाने दिले.

मी एकट्याने उद्धव ठाकरेंसोबत राहून काय केलं असतं? गुलाबराव पाटील यांचं मोठं वक्तव्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed