• Sat. Sep 21st, 2024
तुझ्या वडिलांचा सर्वांदेखत अपमान, इंजिनियर गौरवची मित्रांकडून चेष्टा; मित्राच्या मदतीने आवारेंना संपवलं

पुणे : जनसेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या हत्याकांडामुळे संपूर्ण मावळ तालुका हादरून गेला आहे. मात्र, पोलिसांनी सूत्र हलवत या हत्येच्या मुख्य सूत्रधारालाच ताब्यात घेतल्याने संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला आहे. माजी नगरसेवक भानू खळदे यांचा मुलगा गौरव खळदे याने वडिलांना कानाशिलात लगावल्याच्या रागातून ही हत्या केल्याचं उघड झालं आहे. गौरवने ही हत्या करण्यासाठी जानेवारी महिन्यापासूनच कट आखला असल्याचे पोलीस तपासात समोर आलं आहे.

कोण आहे गौरव खळदे?

गौरव खळदे हा माजी नगरसेवक भानू खळदे यांचा मुलगा आहे. तो स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे आणि त्याच्याकडे सिव्हिल इंजिनियर असल्याचं प्रमाणपत्र देखील आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांचे वडील आणि किशोर आवारे यांच्यामध्ये काही कारणावरून वाद झाले होते. त्यात किशोर आवारे यांनी त्याच्या वडिलांना म्हणजेत भानू खळजे यांच्या कानशिलात लगावली होती. या गोष्टीवरून गौरवला त्याचे मित्र सतत चिडवायचे की, “तुझ्या वडिलांचा सर्वांदेखत अपमान झाला आहे”, याच गोष्टीचा राग त्याने मनात धरला आणि किशोर आवारे यांचा काटा काढला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

वडिलांना मारल्याचा राग, मुलाने कट रचला आणि आवारेंचा काटा काढला, आरोपीने सगळं सांगितलं

गौरव याने ही हत्या करताना त्याचा मित्र श्याम याची मदत घेतली होती. श्याम हा काही दिवसांपासून आवारे यांची रेकी करत होता, आणि योग्य संधीची वाट पाहत होता. संधी मिळताच त्याने तळेगाव नगर परिषददेसमोरच किशोर आवारे यांच्यावर गोळ्या झाळल्या आणि त्यानंतर त्यांच्यावर कोयत्याने वार करून त्यांची हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. मात्र, पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्याने काही तासांतच मुख्य आरोपी पोलिसांना सापडला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मावळ तालुक्यात या घटनेने तणावाचे वातावरण पसरले आहे.

Kishor Aware Murder : जीव गेल्यावरही आवारेंवर वार, दुचाकी हिसकावून आरोपी फरार; धक्कादायक Video

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed