• Sat. Sep 21st, 2024
इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर संशय, पोलिसांनी हळूच उघडला दरवाजा; गपचूप पाहताच सगळे हादरले…

रत्नागिरी : दक्षिण रत्नागिरीत ब्राऊन शुगर व अन्य अमली पदार्थाचा सुळसुळाट झाला असून त्याप्रमाणे जिल्हा पोलिसांच्या विशेष पोलीस पथकाने या विरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. ब्राऊन शुगर व गांजासहित दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर लांजा येथून रात्री उशिरा चार जणांना अमली पदार्थ सेवन करताना ताब्यात घेण्यात आले आहे. रत्नागिरी इथे अटक करण्यात आलेल्या २ युवकांकडून ब्राऊन शुगरच्या ११५ पुड्या व गांजा सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.रत्नागिरी इथे अटक करण्यात आलेल्या तरुणांकडून ब्राऊन हेरॉईन व गांजा जप्त करण्यात आला आहे. जिल्ह्यातील काही युवक या अमली पदार्थांच्या आहारी जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी अमली पदार्थाच्या विरोधात कठोर मोहीम उघडली आहे.

६ वर्षाच्या मुलाने काढलं असं चित्र की शिक्षकांना घाम फुटला, तातडीने पालकांना बोलावलं; सत्य ऐकताच…
रत्नागिरी जिल्ह्यात, मागील काही दिवसात काही इसम अमली पदार्थांची खरेदी व विक्री करत असल्यासंबंधी माहिती प्राप्त झाली. जिल्हा पोलीस अधीक्षक, रत्नागिरी धनंजय कुलकर्णी तसेच अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड व पोलीस निरीक्षक, हेमंतकुमार शहा यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेप्रमाणे परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक डॉ. समाधान पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पोलीस पथक गठित करण्यात आले. या पोलीस पथकाने ही मोठी कारवाई केली आहे.

शुक्रवारी रात्री उशिरा गस्त घालत असताना मिळालेल्या माहितीवरून ही मोठी कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार श्री. शांताराम झोरे यांना धनजीनाका आंबेडकर रोड येथील रशिद हकीम यांचा मुलगा मुबीन हकीम हा त्याचे राहते घरी अंमली पदार्थ विक्री करिता ठेवत असले बाबत गोपनीय माहिती मिळाली होती. या घराच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या रूममध्ये आवाज आल्याने रुमचा दरवाजा उघडून पाहता, त्याठिकाणी दोन इसम रात्री उशिराच्या ११वा. सुमारास संशयितरित्या बसलेले दिसेले तसेच रुममध्ये फॉईल पेपरचे तुकडे, सिगारेटचे अर्धवट जळालेले तुकडे दिसून आल्याने त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या दोन्ही इसमांची चौकशी करण्यात आली.

Heat Wave Alert : महाराष्ट्रावर तीव्र उष्णतेचा धोका, मुंबईसह ‘या’ ११ जिल्ह्यांना अलर्ट जारी…

या कारवाईत

१) मुबिन रशिद हकीम, वय 22 वर्षे, रा. धनजीनाका, आंबेडकरवाडी, जाणाऱ्या रोडवर, ता. जि. रत्नागिरी व
२) मस्तान मकदुम शेख व 24 वर्षे, रा. मच्छिमार्केट, बाजारपेठ, ता. जि रत्नागिरी या दोघांनाही अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईमध्ये आरोपी मुबिन रशिद हकीम, याची अंगझडती घेतली असता त्याच्या खिशात एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये कागदाच्या एकूण ११५ लहान लहान पुड्यांमध्ये टर्की पावडर आणि स्मोकींग ब्रााऊन पेपर मिळून आले. तसेच संशयित आरोपी मस्तान मकदुम शेख याची अंगझडती घेतली असता खिशात एका पारदर्शक प्लास्टिकच्या पिशवीमध्ये गांजा मिळून आला. या दोघांकडेही सापडलेल्या अंमली सदृश्य पदार्थांची अंमली पदार्थ तपासणी किटव्दारे तपासणी करण्यात आली. यावेळी हे पदार्थ ब्राऊन हेरॉईन व गांजा असल्याचे निष्पन्न झाले. या संशयित दोन्ही आरोपींना न्यायालयाने १५ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे

लांजा परिसरातील ४ युवकांवर गुन्हा

दरम्यान लांजा येथील कारवाईत एमाननुरी मोहम्मद वकील अजीजी उर्फ मौलू (वय २२ वर्षे राहणार वैभव वसाहत, मुळगाव औरंगाबाद बगवली जिल्हा संत कबीर नगर, उत्तर प्रदेश), प्रमोद यशवंत गुरव ( ३९, देवधे गुरव वाडी ता. लांजा), विनायक प्रकाश कुरूप (वय २८ राहणार लांजा कुरूपवाडी )आणि उमेश सुभाष गांगण ( व ४२ वर्षे राहणार भांबेड गांगणवाडी तां. लांजा या चौघा तरुणांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. या चौघांवरही लांजा पोलीस ठाण्यात एन. डी. पी. एस. अॅक्ट १९८५ चे कलम ८ (क),२७ सह २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे हे करत आहेत.

धक्कादायक! १५ वर्षीय मुलीने दिला लेकाला जन्म, २ तासांनी चिमुकल्यासोबत केलं भयंकर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed