• Fri. Sep 18th, 2026
Pune Accident : दशक्रियासाठी निघाले, पोहोचण्यापूर्वीच काळची झडप; भीषण अपघातात नवरा-बायकोचा मृत्यू

पुणे : पुण्यामध्ये अपघातांचं सत्र थांबण्याचं काही नाव घेत नाहीय. आज कात्रज – कोंढवा रस्त्यावर एका दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. हा अपघात सकाळी साडेसातच्या सुमारास झाला आहे.

ज्ञानेश्वर वाल्मीक लवांडे (वय ५०, रा, कपिल मल्हार, बाणेर गाव, पुणे) आणि उषा ज्ञानेश्वर लवांडे (वय ४५) अशी अपघातात मृत झालेल्या पती-पत्नीचं नाव आहे.

Uddhav Thackeray: आरपारची लढाई होऊन जाऊ दे, जनताच आपला फैसला करेल; उद्धव ठाकरेंचं शिंदे-फडणवीसांना ओपन चॅलेंज
अपघाताबाबात मिळालेल्या माहितीनुसार, लवांडे दाम्पत्य बाणेरवरुन कोथळे पुंरदरकडे दहाव्याच्या कार्यक्रमासाठी त्यांच्या दुचाकी क्र. एमएच १२ व्हीएच ९७८९ या दुचाकीवरुन जात असताना कात्रज कोंढवा रस्त्यावर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात पती आणि पत्नीचा जागीच मृत्यू झाला.

इस्कॉन टेंम्पल चौकाजवळील आरएमडी शाळेसमोर ही घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच कोंढववा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, दोघांचेही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

मनात शतकाचा विचार नव्हता, फक्त… IPL मधील ऐतिहासिक खेळीनंतर यशस्वी जयस्वाल काय म्हणाला; पाहा VIDEO

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed