• Sat. Sep 21st, 2024
रात्रीच्या वेळी वाहनांवर दगडगोटे फेकून ड्रायव्हरची भंबेरी उडवायचे, मग लुटायचे, मात्र एके दिवशी…

यवतमाळ : नागपूर – हैद्राबाद महामार्गावर वाहन चालकांना गोटमार करुन तसेच लाठीचा धाक दाखवून जबरी चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेले तीन लुटारू वडकी पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहे. हा प्रकार सोमवारी मध्यरात्री उघडकीस आला असून यातील तिघांना पोलिसांनी अटक केली असून एक जण फरार होण्यात यशस्वी झाला. या प्रकरणात वापरण्यात आलेली एक कार पोलिसांनी जप्त केली असून फरार आरोपीचा पोलीस कसून शोध घेत आहेत. समीर येरेकर (रा.वडकी), यूवराज चटकी (रा. दहेगांव ता. राळेगाव), शंकर उर्फ शेषकुमार झिले (रा. येरला जि. वर्धा) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या तिघांची नावे असून कुणाल केराम (रा. वडकी) हा फरार आहे.

राष्ट्रीय महामार्गावर कोणत्याही प्रकारची चोरी अथवा जबरी चोरी होवू नये, नागरिकांच्या जिवाची तसेच मालाची हाणी होवू नये, यासाठी वडकी पोलिसांचे वाहन राष्ट्रीय महामार्गावर नेहमीच गस्तीवर असते. अशातच पोलीस गस्ती दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील देवधरी घाटात सोमवारी मध्यरात्री चार व्यक्ती रोडने ये-जा करणाऱ्या ट्रक आणि इतर वाहनांना दगड मारुन तसेच लाठीचा धाक दाखवून जबरी चोरीच्या प्रयत्नात पोलिसांना आढळून आले. मात्र, पोलिसांना पाहून हे चारही जण एमएच-३१-इए-४६२६ या क्रमांकाच्या इर्टीगा वाहनाने पळून गेले. दरम्यान, पोलिसांनी तात्काळ या प्रकरणातील तीन जणांचा शोध घेतला.

Pune News : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी; पाणी बचतीसाठी महापालिकेचा मोठा निर्णय
त्यांच्या विरोधात ३९३, ३४१, २७९, ३४ या कलमान्वये गुन्हा कायम केला आहे. यातील एक जण अजूनही फरार असून त्यांचा पोलीस कसून शोध घेत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक पियूष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, संजय पुजलवार यांच्या मार्गदर्शनाखाली वडकी ठाणेदार विजय महाले, पथकातील रमेश मेश्राम, विजय बशेशंकर, विकेश ध्यावर्तीवार, आकाश कुदूसे, किरण दासरवार, अरविंद चव्हाण आणि चालक आडपावार यांनी पार पाडली.

Karnataka Election : कर्नाटक कुणाचं? आक्रमक प्रचारानंतर मतदान,५ कोटी मतदार फैसला करणार, संपूर्ण देशाचं लक्ष

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed