• Sun. Sep 22nd, 2024

सर्पदंश झाल्यास नागरिकांना वेळेत औषधोपचार घेण्याचे डॉ. सदानंद राऊत यांचे आवाहन

ByMH LIVE NEWS

May 9, 2023
सर्पदंश झाल्यास नागरिकांना वेळेत औषधोपचार घेण्याचे डॉ. सदानंद राऊत यांचे आवाहन

मुंबई, दि. 9 : ग्रामीण, डोंगरी भागात सर्पदंशाच्या घटना घडत असतात. अशा वेळी सर्पदंश झाल्यास नागरिकांनी घाबरून न जाता तातडीने वेळेत योग्य औषधोपचार घ्यावेत, असे आवाहन डॉ. सदानंद राऊत यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमाच्या माध्यमातून केले आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न या राज्य शासनाच्या पुरस्काराने त्यांना नुकतेच सन्मानित करण्यात आले असून त्या पार्श्वभूमीवर ही मुलाखत घेण्यात आली आहे.

आपल्याकडे पावसाळ्यात सर्पदंशाचे रूग्ण मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. सर्पदंश झालेल्या व्यक्तीस मोकळ्या, स्वच्छ जागी हलवणे, त्याला दिलासा देणे आवश्यक आहे. कारण बऱ्याचदा साप बिनविषारी असतो. मात्र, केवळ भयाने आणि अंधश्रद्धेमुळे रुग्णाचा जीव धोक्यात येऊ शकतो. अशा वेळी सर्पदंश होऊ नये म्हणून नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी, तसेच सर्पदंश झाल्यास कोणते औषधोपचार घ्यावेत याबाबत सविस्तर माहिती डॉ. सदानंद राऊत यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत, बुधवार दि. ९, गुरूवार दि. १० मे २०२३ रोजी सकाळी ७. २५ ते ७. ४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲप वर प्रसारित होणार आहे. ही मुलाखत निवेदक सुषमा जाधव यांनी घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed