• Thu. Mar 12th, 2026
    Jalgaon Crime : तरुणीचा भररस्त्यात तरुणावर चाकू हल्ला, तरुण म्हणाला माझा मर्डर करुन टाक; Video व्हायरल

    जळगाव : जळगाव शहरातील अजिंठा चौकात भरदिवसा एका तरुणीने शिवीगाळ करत एका तरुणावर चक्क चाकू हल्ला केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

    जळगाव शहरातील अजिंठा चौकात हॉटेल महिंद्राजवळ शनिवार ६ मे रोजी सकाळी ११ ते १ वाजेच्या दरम्यान एक तरुण आणि तरुणीचा गोंधळ सुरु होता. या वादात काही वेळाने तरुणीने छोटा चाकू काढला आणि तरुणाला शिवीगाळ करत त्याच्या छातीवर वार केले. या वादात तरुणाला चाकू लागल्याने तरुणाच्या छातीतून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊ लागला.

    Vishwanath Mahadeshwar Passed Away: मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
    तरीही तरुणी त्याच्यावर चाकूने वार करत होती. यादरम्यान तरुण हा तरुणीकडील चाकू हिसकावण्याचा प्रयत्न करत होता. या वादात तरुणाने त्याच्या अंगावरील शर्ट फाडून टाकला आणि तरुणीला “माझा मर्डर करुन टाक”, असे आव्हान करत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.

    भर दिवसा झालेल्या या प्रकाराने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. यावेळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. मात्र, आपसात वाद असेल तसेच तरुणीचा संताप अन् तिच्या हातात चाकू बघून कुणाचीही हे भांडण सोडविण्याची हिंमत झाली नाही. कुणीही दोघांच्या भांडणात पडले नाही. तब्बल अर्धा ते पाऊण तास भररस्त्यावर हा गोंधळ सुरु होता. तरुण दारुच्या नशेत असल्याचं देखील समोर आलं आहे.

    दरम्यान, दोघांचीही नावे अद्याप कळू शकलेले नाहीत. यादरम्यान तरुणी संबंधित तरुणाबद्दल व्हिडीओमध्ये सांगत आहे. यात संबंधित जखमी तरुणही दिसून येत आहे. यात ती तरुणी स्वत: बोलत आहे. सदरच्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियाच्या एका साईटवर अपलोड झाला असून ज्या प्रोफाईलवर हा व्हिडिओ अपलोड झाला आहे ते खाते देखील एका महिलेचे आहे. त्यावरुन व्हिडिओ डाऊनलोड करण्यात येऊन काही वेळातच हा व्हिडीओ व्हाटस्अपवर देखील व्हायरल झाला. काही वेळाने मूळ साईटवरुन हा व्हिडिओ डिलीट झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, या धक्कादायक घटनेप्रकरणी काल उशीरापर्यंत पोलिसांत कुठलीही नोंद नसल्याचेही समोर आलं आहे.

    जिवा महालांच्या वंशजाला मिसेस मुख्यमंत्र्यांची मदत, प्रतीक्षा महालेंच्या लग्नासाठी धनादेश

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed