छत्रपती संभाजीनगर: प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमादरम्यान चर्चा होईल असे काही ना काही घडत असते. वैजापूर तालु्क्यातील महालगाव येथील गौतमीच्या कार्यक्रमात असाच काहीसा धक्कादायक प्रकार घडला. येथील कार्यक्रमात गौतमी पाटील मंचावर नृत्य सादर करत असताना समोर तुफान गर्दी जमली होती. तुडुंब गर्दी झाल्याने काही तरुण दुकानाच्या पत्र्याच्या छतावर बसले होते. कार्यक्रम रंगात आला असताना छतावर वजन जास्त झाल्याने हे शेड खाली कोसळलं. सुदैवाने यात कोणाला गंभीर दुखापत झालेली नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.नर्तकी गौतमी पाटील हिचा ८ मे रोजी वैजापूर येथील महालगाव येथे नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी जमली होती. जागा कमी पडल्याने काही जण दुकानाच्या पत्र्याच्या छतावर बसले होते. गौतमीचे चाहचे मिळेल त्या जागी उभे राहून कार्यक्रम पाहत होते. हा कार्यक्रम रंगात आला असतानाच एकच गोंधळ उडाला. कारण ज्यावर गौतमीचे चाहते बसले होते ते पत्र्याचे छतच खाली कोसळले.
गौतमी पाटील संभाजीनगरमध्ये येणार असल्यामुळे तिचे चहाते मोठ्या संख्येने गावात जमले होते. कार्यक्रमाला सुरुवात झाली. काही तरुणांना जागा नसल्याने ते समोरच्या दुकानाच्या पत्र्याच्या शेडवर उभे राहून कार्यक्रम पाहू लागले. मात्र शेड कमकुवत होता आणि यावरती क्षमतेपेक्षा जास्त वजनाने तरुण जमल्यामुळे तो पत्र्याचे छत कोसळले. यावर उभ्या असलेल्या दहा ते पंधरा जण पत्र्याच्या छतासोबत खाली कोसळले.

सुदैवाने यात कुठलीही मोठी दुखापत झाली नसल्याची प्राथमिक माहिती स्थानिकांनी दिली आहे. दरम्यान, या घटनेची एकच चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे. गौतमी पाटील म्हटले की चर्चा होणारच अशा प्रतिक्रिया लोकांमधून ऐकायला मिळत आहेत.