अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी पोलीस स्टेशन हद्दीतील म्हैसपूर येथे शिव महापुराण कथेत वारंवार घडत असलेल्या चोरीच्या घटनेचं गांभीर्य पाहता, अकोल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप घुगे यांनी या गुह्याचा तपास अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक संतोष महल्ले यांना सोपविला. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिवपुराण कथेत या मंगळसूत्र चोरट्यांवर नजर ठेवण्यासाठी पोलिसांनी भाविकांची मदती घेतली. ही कथा सपल्यानंतर जेवण करण्यासाठी जाणारी महिलांची गर्दी, या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातून सोनसाखळी चोरी करताना काही महिलांना पोलिसांनी घटनास्थळीच ताब्यात घेतलं. यावेळी तब्बल दहा महिलांना अटक करण्यात आली. या सर्व महिला महाराष्ट्र राज्यातील व बाहेर राज्यातील आहे.
महिला आरोपींना अटक
आशा हरीलाल धोबी (रा. रेल्वे स्टेशन जवळ नागपुर), मुंज्जु देवी राजु धोबीरा (रा. रेल्वे स्टेशन जवळ नागपुर), चंदा सोनु धोबी (रा. रेल्वे स्टेशन जवळ नागपुर), अनिता सुरेश धोबी (रा रेल्वे स्टेशन जवळ नागपुर), कमलेश सुरजलाल बावरीया (रा. रंतीत नगर भरतपुर राज्य राजस्थान), शशी रीकु बावरीया (रा.रंतीत नगर भरतपुर राज्य राजस्थान), कश्मीरा हीरालाल बावरीया (रा.रंतीत नगर भरतपुर राज्य राजस्थान), प्रीया संदीप उन्हाळे (रा सावंगी मेघे जि वर्धा), सुरया राप्रसाद लोंडे (रा सावंगी मेघे जि वर्धा), लता किशन सापते (रा. भीमनगर इदोर राज्य मध्यप्रदेश) अशी आरोपी महिलांची नावे आहेत. महिला पोलीस अमलदारांनी त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे ३ मिनी डोरले व जोड, दोन मिनी मंगळसुत्र वजन ३२ ग्रॅम, ज्याची किंमत १ लाख ८२ हजार इतकी आहे.
दरम्यान, ताब्यात घेण्यात आलेल्या या सर्व दहा महिलांवर अनेक राज्यासह इतर ठिकाणी विविध पोलीस ठाण्यात या अगोदर गुन्हे सुद्धा दाखल आहेत. या घटनेचा पुढील तपास बार्शीटाकळी पोलीस करीत आहे. ही कामगिरी पोलीस अधिक्षक संदिप घुगे, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख संतोष महल्ले, सहाय्यक पोलिस निरीक्षक गोपाल ढोले व महेश गावंडे, पिएसआय गोपीलाल मावळे, पोलीस कमर्चारी फीरोज खान, भास्कर धोत्रे, खुशाल नेमाडेसह आदींनी केली आहे.