• Sat. Sep 21st, 2024

सराईत चोरट्याने लढवली चोरीची अजब शक्कल, पण करामत फार काळ टिकली नाही, शेवटी व्हायचे तेच झाले

सराईत चोरट्याने लढवली चोरीची अजब शक्कल, पण करामत फार काळ टिकली नाही, शेवटी व्हायचे तेच झाले

जुन्नर : अनेक प्रकारचे चोर अनेक प्रकारे चोरी करत असलेले आपण ऐकले आहे. अनेक चोर पकडले जाऊ नये म्हणून शक्कल लढवत असतात. असाच काहीसा प्रकार जुन्नरमध्ये उघडकीस आला आहे. येथे एका सराईत चोराने चोरी करण्यासाठी वेगळीच शक्कल लढवली. मात्र, हा चोर पोलिसांच्या तावडीत सापडलाच.ज्या घरात दशक्रियेचा कार्यक्रम असेल असे घर तो चोर चोरीसाठी निवडत असे. मात्र त्याची ही करामत फार काळ टिकू शकली नाही. एखाद्या गावात कोणत्या कुटुंबात दशक्रिया आहे. याचा शोध घेऊन दशक्रीयेच्या दिवशी कुटुंब दशक्रियेसाठी गेले, की भरदिवसा त्या घराची घरफोडी करून सोने, रोकड लंपास करण्याचा फंडा आत्मसात केलेल्या सराईत चोरट्याला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा पथकाने गजाआड केले.

साताऱ्याची पुनरावृत्ती सोलापुरात; शरद पवार पुन्हा एकदा पावसात भिजले, यावेळचं कारण वेगळं
आरोपीकडून ५ लाख ४६ हजार ४८१ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आकाश प्रकाश विभुते (वय ३२, राहणार- फुलसुंदर अपार्टमेंट,वारुळवाडी,तालुका- जुन्नर) असे या सराईत चोरट्याचे नाव आहे. आकाश विभुते हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुत्यातील सुपली (पोस्ट- पळशी) येथील रहिवासी आहे.

हा चोरटा विशिष्ट पद्धतीने करत असे चोऱ्या

आकाश विभुते याने जुन्नर तालुक्यातील निरगुडे आणि गोळेगाव येथे आपल्या विशिष्ट पद्धतीने चोऱ्या केल्या होत्या. तर आरोपीविरोधात सोलापूर जिल्ह्यातील करकंब आणि सांगोला या पोलिस ठाण्यात देखील घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव शेलार, हवालदार दिपक साबळे, विक्रम तापकीर, मंगेश थिगळे, राजू मोमीन, चंद्रकांत जाधव, संदीप वारे, कर्मचारी अक्षय नवले ,दगडू विरकर यांच्या पथकाने आरोपी विभूते याला अटक करण्यात आली आहे.

ती प्रियकरासोबत पायरीवर बसून बोलत होती, इतक्यात ३ युवक आले आणि केले धक्कादायक कृत्य
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून ८ तोळे ७ ग्रॅम वजनाचे सोने हस्तगत करण्यात आले आहे. त्याच प्रमाणे मोटारसायकलही जप्त करण्यात आली. त्यांच्याकडून एकूण साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

विधवा महिलेला दाखवले लग्नाचे आमिष, अनेकदा घेतला गैरफायदा, तरुणाबाबत सत्य कळताच महिला हादरली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed