• Sat. Sep 21st, 2024

व्हिडिओ लाइक करुन पैसे कमवा, स्कॅमला इंजिनिअर बळी, कॅन्सरग्रस्त आईसाठी जमवलेली पुंजी गमावली

व्हिडिओ लाइक करुन पैसे कमवा, स्कॅमला इंजिनिअर बळी, कॅन्सरग्रस्त आईसाठी जमवलेली पुंजी गमावली

नवी मुंबई : सध्या जवळपास सर्वच कामं इंटरनेटमुळे स्मार्टफोनवरच केली जातात. इंटरनेटच्या जगात अनेकांची फसवणूक केली जात असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. एखाद्या लिंकवरुन, गेम, फ्रॉड कॉलवरुन फसवणूकीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. अशीच एक घटना खारघरमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत घडली असून पैशाचं आमिष दाखवून फसवणूक करण्यात आली आहे.खारघरमध्ये राहणाऱ्या एक अभियंत्याची ऑनलाइन कमाईचं आमिष दाखवून ४ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यूट्यूबवरील व्हिडिओला लाइक करण्याच्या बदल्यात पैसे मिळवून देण्याचं आणि नंतर गुंतवणुकीचं आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केली आहे.

ऑनलाईन गेमच्या नादात ४० लाख घातले, बापाची शेती विकली, राजाचा रंक झाला

नवी मुंबई पोलिस आयुक्तालय क्षेत्रामध्येही सायबर गुन्हेगारांची संख्या वाढत आहे. अनेक गोष्टींची आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक केली जात आहे. खारघरमध्ये राहणाऱ्या एक अभियंत्याच्या आईला कॅन्सर झाला आहे. तिच्या उपचारासाठी त्याने पैसे साठवण्यास सुरुवात केली होती. ९ एप्रिलला त्यांना एक मेसेज आला. त्या मेसेजमध्ये आम्ही पाठवलेल्या व्हिडिओ लिंकला लाइक केल्यास पैसे मिळतील, असं सांगण्यात आलं होतं.

Nashik News: मित्रांसोबत सहलीसाठी गेला, रात्रभर टेंटमध्ये राहिला; सकाळी आंघोळीसाठी गेला आणि आक्रित घडलं
त्या व्यक्तीने व्हिडिओ लाइक केले. सांगितल्याप्रमाणे व्हिडिओ लाइक केल्याबद्दल त्यांना पैसेही मिळाले. त्यानंतर बिटकॉइनची लिंक दिली. बिटकॉइनच्या लिंकमध्ये गुंतवणूक करण्याचं सांगण्यात आसं. या लिंकमध्ये काही गुंतवणूक केल्यास आणखी पैसे मिळतील, असं सांगितलं. पुढे टप्प्याटप्प्याने त्यांच्याकडून ४ लाख ६५ हजार रुपये घेतले. मात्र, पैसे घेतल्यानंतर त्यांचा मोबदला दिला नसल्याने फसवणूक झाल्याचं निदर्शनास आलं आहे.

Sambhajinagar Crime: कॅफेजवळ कुत्र्याचा मृतदेह दिसला, नंतर CCTV पाहून मालकही हादरला; पोलिसांकडून तपास सुरू
खारघरमध्ये राहणाऱ्या या इंजिनिअरची ऑनलाइन कमाईचं आमिष दाखवून अशाप्रकारे ४ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर अनेकांचे डोळे उघडले आहेत. पोलिसांकडूनही अनेकदा नागरिकांना इंटरनेट, सोशल मीडियावर आलेल्या कोणत्याही गोष्टींना बळी न पडण्याचं आवाहन केलं जातं. तसंच कोणत्याही साइटवर शॉपिंग किंवा इतर गोष्टी करताना त्या सावधपणे कराण्याचं, कोणत्याही लिंकवरुन QR कोड स्कॅन न करण्याचं अनेकदा सांगितलं जातं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed