• Thu. Sep 10th, 2026

 महाराष्टात होऊ शकते या नवीन 22 जिल्ह्यांची निर्मिती 

ByMH LIVE NEWS

May 2, 2023

मुंबई- प्रतिनिधी

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी पाहता महाराष्ट्रातील मोठमोठे निर्णय मार्गी लावण्याचे प्रयत्न चालू सरकार करत आहे.

उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव बदलून धाराशिव करणे व तसेच औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करणे हा देखील निर्णय त्यामध्ये होता.

त्याचबरोबर विविध जिल्ह्यांची नवनवीन निर्मिती करणे जान देखील प्रस्ताव देखील मंत्रिमंडळात ठेवण्यात आले व तसेच यावर विचार करण्यात यावा असेही सांगण्यात आलेले आहे त्यामुळे राज्यातील नवीन जिल्ह्यांची निर्मिती होऊ शकते असे संकेत दाट दिसून येत आहे.

1 मे 1960 रोजी जेव्हा महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हापासून महाराष्ट्रात भाषांतर वर महाराष्ट्रात 26 जिल्हे तयार करण्यात आले यामध्ये सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, धुळे, पुणे, सांगली, नाशिक, रत्नागिरी, बहू मुंबई, ठाणे, कुलाबा, बीड, परभणी, नांदेड, धाराशिव, अहमदनगर, अकोला, नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, जळगाव, भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.

यामध्ये महाराष्ट्रात नवीन या जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन जिल्हे तयार करण्यात यावे असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

  • महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून शिर्डी संगमनेर आणि श्रीरामपूर असे तीन जिल्हे नव्याने तयार करावे असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
  • बीडमधून आंबेजोगाई जिल्हा तयार करण्यात यावा असे नियोजन करण्याचे आहे.
  • ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून मीरा-भाईंदर आणि कल्याण या दोन जिल्ह्यांची निर्मिती करावी.
  • तसेच ठाणे जिल्ह्यातून तयार झालेला पालघर जिल्ह्याचे विभाजन करून या जिल्ह्यात मध्ये अजून एक नवीन जिल्हा तयार करावा.
  • लातूर मधून उदगीर जिल्हा तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
  • पुणे जिल्ह्यातून शिवनेरी जिल्हा तयार करावा असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
  • अमरावती जिल्ह्यातून विभाजन करून अचलपूर हा नवीन जिल्हा तयार करण्यात यावा व तसेच यवतमाळ जिल्ह्याचे विभाजन करून पुसद हा नवीन जिल्हा तयार करण्यात यावा असे प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
  • भंडारा जिल्ह्यातून साकोली हा नवीन जिल्हा व तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून चिमूर हा नवीन जिल्हा तयार करण्यात यावा असे प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
  • जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ हा नवीन जिल्हा व तसेच नांदेड जिल्ह्याचे विभाजन करून किनवट हा नवीन जिल्ह्याचे तयार करावा असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
  • सातारा जिल्ह्याचे विभाजन करून मानदेश व तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील मानगड हा नवीन जिल्हा तयार करण्यात यावा असे सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed