• Mon. Nov 25th, 2024
    माईक हाती घेतला, पण शब्द फुटेना, भावना अनावर, रडत रडत जयंत पाटलांचं भाषण

    मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सक्रीय राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली आणि यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये उपस्थित असलेले राष्ट्रवादी नेते कार्यकर्ते गलबलून गेले. सगळ्यांचाच धीर खचला. अनेक जण धायमोकलून रडायला लागले. महाराष्ट्राचा बुलंद आवाज… शरद पवार शरद पवार… अशा घोषणा सुरु झाल्या. साहेब, काहीही करा पण निवृत्तीचा निर्णय मागे घ्या, अशी मागणी कार्यकर्ते नेते करु लागले. तब्बल एक तास पवार यांची मनधरणी सुरु होती. अशा भावुक वातावरणात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भावना व्यक्त करायला माईक हाती घेतला. पण माईक हाती घेताच ते धायमोकलून रडायला लागले. त्यांना भावना अनावर झाल्या.

    पवारसाहेब तुमच्या नावाने आम्ही लोकांना मतं मागतो. तुमच्या नावाने लोक पक्षाला मतं देतात. आज तुम्हीच जर बाजूला गेले तर आम्ही लोकांसमोर काय म्हणून जायचं, कुणाच्या नावाने मतं मागायची..? आज तुम्ही राजकारणात राहणं, हे फक्त राज्यातल्या लोकांसाठीच नाही तर देशातल्या लोकांसाठी गरजेचं आहे. आज राष्ट्रवादी पक्ष पवारसाहेबांच्या नावाने ओळखला जातो. तुम्ही असं अचानक बाजूला जाणं हे कुणालाही रुचणारं नाहीये. तुम्हाला निवृत्तीचा कोणताही अधिकार नाही, परस्पर निर्णय घेण्याचा अधिकार नाही, अशा भावना जयंत पाटील यांनी बोलून दाखवल्या.

    भाकरी फिरवण्याची सुरुवात स्वत:पासून, निवडणुकीला उभे राहणार नाही, अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार : शरद पवार
    अजित पवार, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, नरहरी झिरवाळ यांच्या भावनिक भाषणानंतर जयंत पाटील यांची बोलायची वेळ आली. त्यांना ४० वर्षांचं त्यांचं राजकीय जीवन आठवलं. साहेब आम्ही तुमच्याकडे बघून राजकारणात प्रवेश केला, तुमच्या साथीने राजकारण केलं. तुमच्याकडून राजकीय धडे घेतले, आता आम्ही कुणाकडे जायचं? असा प्रश्न विचारताना जयंत पाटलांच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते.

    घाणेरडे आरोप..प्रत्यारोप..राजकारणामुळं बाळासाहेबांनी राजीनामा दिलेला पण,पवारांच्या निर्णयानंतर राऊतांचं ट्विट
    जितेंद्र आव्हाडही रडले

    मी नागपूरमध्ये २००४ साली तुम्हाला भेटलो. त्यावेळी तर तुमची तब्येत अजिबातच बरी नव्हती. तोंडातून रक्त वाहत होतो. कर्करोगाशी लढाई सुरु होती. आता तर तुमची तब्येत फारच बरी आहे. तुम्ही असा निर्णय घेऊ नका, असं विनंती करताना जितेंद्र आव्हाडही रडले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed