दरम्यान, अकोट बाजार समितीत अनेक दिग्गजांना पराभवाचं तोंड पहावं लागलं आहे. यात ठाकरे गटाचे माजी आमदार संजय गावंडे यांचा सोसायटी मतदारसंघातून सहकार गटाचे गजानन डाफे यांनी पराभव केला. इतर पराभूत दिग्गजांमध्ये माजी सभापती आणि सध्याचे मुख्य प्रशासक गजानन पुंडकर, संचालक राजू मंगळे, विलास साबळे यांचा पराभव झाला.
या निवडणुकीत नेत्यांच्या घराण्याच्या दुसऱ्या पिढीनं बाजार समितीच्या राजकारणात ‘एंट्री’ केली आहे. जेष्ठ सहकार नेते, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष आणि अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रमेश हिंगणकर यांचा मुलगा धीरज हिंगणकर विजयी झाला आहे. यासोबतच बच्चू कडू यांच्या ‘प्रहार’चे जिल्हाध्यक्ष कुलदीप वसू हे सहकार गटाकडून विजयी झालेत.
अकोट बाजार समितीतील असं आहे पक्षीय बलाबल
एकूण जागा : १८
सहकार गट (काँग्रेस-राष्ट्रवादी-भाजप) : १५
अपक्ष : ०३
असे आहेत अकोटच्या विजयी उमेदवारांची नावं- पक्ष/आघाडी
शंकरराव लोखंडे- सहकार, अविनाश जायले- सहकार, रमेश वानखडे- सहकार, अंजली सोनोने- सहकार, अरूणा अतकड- सहकार कुलदीप वसू- सहकार, गोपाल सपकाळ- सहकार, सुनिल गावंडे- अपक्ष, रितेश अग्रवाल- अपक्ष, अजमल खा आसिफ खा- अपक्ष, प्रमोद खंडारे- सहकार, श्याम तरोळे- सहकार, गजानन डाफे- सहकार, विजय रहाणे- सहकार, बाबुराव इंगळे- सहकार, धिरज हिंगणकर- सहकार, प्रशांत पाचडे- सहकार, अतुल खोटरे- सहकार असे अकोट बाजारात समितीतील विजयी उमेदवार आणि त्यांच्या पक्षांची नावे आहेत.
बार्शीटाकळी कृषी उत्पन्न बाजार समिती-
अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी कृषी बाजार समितीवर सहकार गटाने आपली सत्ता राखली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे गट आणि भाजपने ‘सहकार पॅनल’च्या झेंड्याखाली एकत्र निवडणूक लढविली. ज्यामध्ये १८ पैकी १५ जागा जिंकल्या आहे, अन् सहकार आघाडीनं बार्शीटाकळी बाजार समितीवर आपली सत्ता कायम राखली आहे. तर वंचित आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या आघाडीला फक्त ३ जागांवर विजयी मिळाला आहे. वंचितनं मिटकरींसह राष्ट्रवादीचे माजी सभापती विनोद थुटे यांना सोबत घेत निवडणूक लढविली होती. पण त्यांना या निवडणुकीत पराभवाला सामोरं जावे लागले. सहकार गटाचं नेतृत्व भाजप आमदार हरीश पिंपळे आणि काँग्रेसनेते सुनिल धाबेकर यांनी केलं आहे.
बार्शीटाकळी बाजार समितीतील पक्षीय बलाबल अन् विजयी उमेदवार
एकूण जागा : १८
सहकार आघाडी (काँग्रेस-राष्ट्रवादी-ठाकरे गट आणि भाजप) – १५
वंचित- अमोल मिटकरी आघाडी – ०३
मंगला गोळे- सहकार, गंगाबाई सोनटक्के- सहकार, महादेव काकड- सहकार, अशोक राठोड- सहकार, अशोक कोहर- वंचित-मिटकरी, कल्पना जाधव- वंचित -मिटकरी, गोपाळराव कटाळे-वंचित-मिटकरी, शेख अजहर शेख जमीर- सहकार, रमेश बेटकर- सहकार, अशोक इंगळे- सहकार, सुरेश शेंडे- सहकार, अनिलकुमार राऊत- सहकार, गोवर्धन सोनटक्के – सहकार, प्रभाकर खांबलकर- सहकार, महादेव साबे- सहकार, रूपराव ठाकरे- सहकार, वैभव केदार- सहकार, सतीश गावंडे- सहकार असे बार्शीटाकली कृषी बाजार समितीतील वियजी उमेदवार नावे आहे.