मुंबई, दि.२८ : केंद्र शासनाने ओला, उबर व इतर एग्रीगेटर्स कंपन्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्याविचारात घेऊन ॲप आधारित वाहनांच्या प्रचलनाकरीता महाराष्ट्र मोटार वाहन समुच्चयक नियमावली करण्यासाठी सेवा निवृत्त अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.
नागरिकांची मते व अभिप्राय विचारात घेऊन मसुदा तयार करण्यात येणार आहे. तरी या बाबत नागरिकांनी [email protected] या ई-मेलवर दिनांक ९ मे २०२३ पर्यंत अभिप्राय सादर करावेत, असे आवाहन राज्याच्या परिवहन आयुक्त, यांनी केले आहे.
या विषयी अधिक माहितीसाठी कैलास कोठावदे, सहाय्यक परिवहन आयुक्त, परिवहन आयुक्त कार्यालय, मुंबई यांच्याशी संपर्क साधावा. (मो. ९५५२८८३९३०/ ई-मेल- [email protected]) केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचना www.morth.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
०००
काशीबाई थोरात/विसंअ