• Sat. Sep 21st, 2024
१३२ किलोचा केक अन् आतषबाजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर-रमाईंच्या जयंतीचा मुंबईत भव्य सोहळा

Edited byअनिश बेंद्रे||Updated: 21 Apr 2023, 9:29 pm

Dr Babasaheb Ambedkar : जगप्रसिद्ध शिंदे घराण्यातील संगीतकार व गायक आनंद शिंदे यांचे गायन व अत्युच्च दर्जाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद उपस्थितांना मनमुराद लुटता येणार आहे.

 

मुंबई :डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती त्याचबरोबर त्यागमूर्ती माता रमाई यांची शतकोत्तर रौप्य महोत्सवी (१२५ वी) जयंती आणि डॉ बाबासाहेब आणि माता रमाई यांच्या लग्नाचा ११७ वा वाढदिवस असा एकत्र सोहळा गोरेगाव पश्चिम येथील अण्णाभाऊ साठे या मैदानात मोठ्या जल्लोषात, अतिभव्य स्वरुपात रविवार दिनांक २३ एप्रिल रोजी संध्याकाळी ५ वाजता साजरा करण्यात येणार आहे. १३२ किलोचा केक, डोळ्याचे पारणे फिटणारी आतषबाजी या सोहळ्याचे खास आकर्षण असणार आहे.यासह जगप्रसिद्ध शिंदे घराण्यातील संगीतकार व गायक आनंद शिंदे यांचे गायन व अत्युच्च दर्जाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद उपस्थितांना मनमुराद लुटता येणार आहे. माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील काँग्रेस, ठाकरे गट, वंचित बहुजन आघाडी अशा सर्वच पक्षांना आमंत्रित करण्यात आले आहे.

या सोहळ्याला सर्व जाती धर्माच्या भारतीयांना आदरपूर्वक उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आल्याचे या कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गोरेगाव तालुका अध्यक्ष अजय विचारे यांनी केले आहे. त्यांच्याच संकल्पनेतून हा भव्यदिव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed