• Sat. Sep 21st, 2024

अतिक अहमद- अश्रफच्या हल्लेखोरांवर पोलिसांनी गोळ्या का झाडल्या नाहीत; अखेर कारण समोर

अतिक अहमद- अश्रफच्या हल्लेखोरांवर पोलिसांनी गोळ्या का झाडल्या नाहीत; अखेर कारण समोर

प्रयागराजःउत्तर प्रदेशमधील माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ याची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. प्रसारमाध्यमे आणि पोलिसांसमोरच अतिकवर गोळ्या झाडण्यात आल्या. या हत्याकांडानंतर देशभरात खळबळ माजली आहे. देशभरातून प्रतिक्रिया येत असताना उत्तर प्रदेश पोलिसांवर प्रश्न ही उपस्थित होत आहेत. हल्लेखोरांनी अतिकवर गोळ्या झाडल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर गोळ्या का चालवल्या नाहीत?; असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.१५ एप्रिलला अतिक व अश्रफ या दोघांना वैद्यकीय चाचणी करण्यासाठी प्रयागराज येथील रुग्णालयात आणण्यात आले होते. रात्री दहाच्या सुमारास हे दोघेही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. वृत्तवाहिन्यांचे कॅमेरेही यावेळी सुरू होते. काही जण मोबाइलमध्ये त्याचे चित्रीकरण करीत होते. हे सारे सुरू असताना, प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींच्या गराड्यातील दोघांनी अतिशय जवळून अतिक अहमद व अशरफ यांच्यावर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात दोघेही रक्तबंबाळ होत जमिनीवर कोसळले व काही वेळातच त्यांनी प्राण सोडले.

१८ वर्षांनंतर खरा ठरला महिलेचा शाप, माफिया अतिकचे संपूर्ण कुटुंबच संपले, काय घडलं होतं नेमकं?
या प्रकरणात पोलिसांनी आरोपींवर गोळी का चालवली नाही असे प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याच्या म्हणण्यानुसार, पोलिसांना अॅक्शन घेण्याचा वेळच मिळाला नाही. अचानक काय झाले हे समजेपर्यंत गोळीबार थांबला होता. मात्र, गोळीबार थांबताच तिघांनाही अटक करण्यात आली.

एन्काउंटर होईल किंवा…; १९ वर्षांपूर्वीच अतिक अहमदने केली होती मृत्यूची भविष्यवाणी
उत्तर प्रदेशचे माजी डीजीपी एके जैन यांनी सांगितले की, सर्वकाही इतक्या लवकर घडले की पोलिसांना वेळ मिळू शकला नाही. पोलिस काय करायचे ते ठरवू शकले नाही. त्याचवेळी आणखी एका आयपीएस अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिसांनी तिन्ही मारेकऱ्यांवर गोळीबार केला असता, तर हत्येमागील कारस्थान कळले नसते. त्यामुळं त्यांना पकडण्याखेरीज पोलिसांकडे दुसरा मार्ग नव्हता.

योगींची दहशत, एन्काऊंटरने थरकाप, कुख्यात गुंड अतिक अहमदही थरथरायला लागलाय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed