• Sat. Sep 21st, 2024

पेण ते पनवेल ४५ मिनिटांचा थरार, वनविभागाने समुद्राच्या पोटातील ३० टन वजनी खजिना पकडला, किंमत…

पेण ते पनवेल ४५ मिनिटांचा थरार, वनविभागाने समुद्राच्या पोटातील ३० टन वजनी खजिना पकडला, किंमत…

नवी मुंबई:रायगड जिल्ह्यातील पेण ते पनवेल पाठलाग करून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ३० टन कॅपिज शेल जप्त केले आहेत.या प्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हाही दाखल केला आहे. या शेलची किंमत कोट्यवधींच्या घरा असल्याची माहिती आहे.पेण ते पनवेल ४५ मिनिटं पाठलाग करत वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी फिल्मी स्टाईलने कोट्यावधींचे कॅपिझ शेल जप्त केले आहेत. वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अनुसार हे शंख संरक्षित आहेत. गुप्त माहितीच्या आधारे वन अधिकाऱ्यांनी दोन व्यावसायिक वाहनांचा तब्बल पेण ते पनवेल असा पाठलाग करुन हे शेल जप्त केले आणि २ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

जप्त केलेल्या दोन्ही वाहनांमध्ये शंखांनी भरलेल्या अनेक गोण्या होत्या. यामुळे हे रॅकेट प्रचंड मोठे असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. वन अधिकारी आता हा साठा ठेवण्याचे ठिकाण शोधत असून त्यांचा उगम आणि उपयोगाची चौकशी करण्यात येते आहे.

देवाने तुम्हाला माझ्या… उबर ड्रायव्हरने दिलं अनोळखी प्रवाशाला जीवदान, एक ऑफर अन्…
तळोजा येथील गोदामामध्ये हे सापडले आहेत. पाठलाग केलेल्या दोन वाहनांमध्ये हे शेल पोत्यात रचून ठेवले होते. तेथे एक रॅकेट कार्यरत असल्याचे दिसते. अधिकाऱ्यांनी ३० टन कॅपिज शेल जप्त केले आहेत. या प्रकरणाचा तपास आता प्राथमिक टप्प्यात आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. २०१७ मध्ये, उलवे येथील युनिटमधून ८० मेट्रिक टन कॅपिज सी शेल जप्त करण्यात आले होते.

capiz sells

30 टन कॅपिज शेल जप्त

कसे असतात हे कॅपिज शेल

सपाट पण मोत्यासारखे दिसणारे अर्ध-पारदर्शक शेल हे गुजरात, महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातील समुद्र किनारी आढळतात. यांचा वापर झुमर आणि लॅम्पशेड्स आणि इतर सजावटीच्या वस्तूंसाठी केला जातो. विशेषत: आखाती प्रदेशात यांना खूप मागणी आहे. या कवचांची अवैधरित्या कोट्यवधी रुपयांना निर्यात केली जाऊ शकते. वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ अनुसूची IV अंतर्गत त्यांच्या व्यापाराचे नियमन करतो. याचा अर्थ असा की ते समुद्रकिनाऱ्यांवरून कापले घेतले जाऊ शकतात आणि हस्तकला इत्यादींमध्ये वापरले जाऊ शकतात, परंतु तेही मर्यादित प्रमाणातच.

नाटकनेक्ट फाऊंडेशनच्या म्हणण्यानुसार, झूमर, टेबलटॉप्स, कोलॅप्सिबल स्क्रीन, फर्निचर, लॅम्पशेड्स, कटलरी आणि दागिने यासारख्या सजावटीच्या वस्तूंमध्ये शेल्सचा वापर होतो. याची किंमत १० हजार ते ५ लाखांपर्यंत असू शकते. उदाहरणार्थ, झूमरची किंमत ५ लाख रुपये आणि फोल्डेबल पार्टिशन स्क्रीनची किंमत ३.८ लाख रुपये असू शकते. सजावटीच्या वस्तूंची तसेच सैल शेल्सची विक्री करणारे ऑनलाइन स्टोअर्स आहेत ज्याची किंमत प्रत्येकी १०० रुपये आहे. नाटकनेक्टचे संचालक बी. एन. कुमार असे म्हणाले की, आखाती (गल्फ) देशांमध्ये ड्रिल पाईप्समध्ये सिमेंट भरण्यासाठी, तेल उत्खननात या शेल पावडरचा वापर केला जात असल्याच्या बातम्या येत असून सरकारने याची चौकशी केली पाहिजे.

शिर्डीतील रामनवमी यात्रेत ब्रेक डान्स पाळणा अचानक तुटला; पाच जण गंभीर जखमी, चालकाचा हलगर्जीपणा

वनविभागाला गुप्त माहिती

वनविभागाला मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. सहाय्यक वनसंरक्षक संजय वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली उरण येथील परिक्षेत्र अधिकारी नथुराम कोकरे, पेण येथील कुलदीप पाटकर आणि पनवेल येथील ज्ञानेश्वर सोनवणे यांच्या पथकाने दोन वाहनांचा पाठलाग करून त्यांना अडविण्यात यश मिळविले. रायगडचे विभागीय वन अधिकारी आशिष ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२ च्या अनुसूची IV (जुना कायदा) मध्ये सूचीबद्ध केलेल्या प्रतिबंधित व्यापाराचे नियमन केले जाते. याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि रॅकेटचा तपशील, ते कोठून आले आणि ते कोठे नेण्यात येत होते याविषयी अधिक तपास सुरू आहे.”

आई उठ ना, माकडिणीच्या मृतदेहाजवळ पिल्लाचा टाहो; रुग्णवाहिका चालकामुळे मिळाले जीवदान
याप्रकरणी सहायक वनसंरक्षक वाघमोडे म्हणाले, “आम्हाला तळोजा येथे गोदाम सापडले. आम्ही पाठलाग केलेल्या दोन वाहनांमध्ये आम्हाला कॅपिज शेल सापडले. ते बारीक पोत्यात रचून ठेवले होते. तेथे एक रॅकेट कार्यरत असल्याचे दिसते. आम्ही 30 टन कॅपिज शेल जप्त केले आहेत. तपास आता प्राथमिक टप्प्यात आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed