• Sat. Sep 21st, 2024
Video : एकाच्या हातात स्टेअरिंग तर दुसऱ्याच्या हातात दोरी; दोरीचा वापर करत चालकाने चालवली बस

नाशिक: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसच एक भयान वास्तव समोर आलं आहे. महामंडळाच्या अनेक नादुरुस्त बसमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. परंतु कल्याण जवळच्या विठ्ठलवाडी आगारातून अमळनेरकडे जाणाऱ्या बसमधील प्रवाशांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागला आहे. त्या मागचं कारण म्हणजे एसटी महामंडळाची नादुरुस्त बस आहे. अमळनेरच्या दिशेने निघालेले असताना प्रवासामध्येच एक्सलेटरचा पायडल तुटल्याने चालकाने स्टेअरिंग सांभाळलं तर वाहकाने एक्सलेटर सांभाळलं.

बस आगारातून निघालेली असताना प्रवासामध्येच एक्सलेटरचा पायडल तुटला आणि यावेळी बसमध्ये प्रवासी होते. वेळेला करणार तरी काय? मग दोरीचा वापर करत बस चालकाने बस नाशिकपर्यंत पोहोचवली. चालक स्टेअरिंग पकडून गाडी चालवत आहे तर वाहक एक्सलेटरला बांधलेली दोरी हातात पकडून नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. या संपूर्ण प्रकारामुळे प्रवाशांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागला. या धावत्या बसमधील ही भयानक दृश्य एका प्रवाशांना आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली आहेत. या संपूर्ण प्रकाराने बसमधील प्रवाशांनी देखील संताप व्यक्त केला आहे.
खारघरहून येताना मीनाक्षीताईंचा हात सुटला, अन् डोळ्यादेखत…मैत्रिणीने सांगितला भयावह अनुभव
आज गुरुवारी सकाळी सात वाजता कल्याण नजीक असलेल्या विठ्ठलवाडी आगारातून अमळनेरच्या दिशेने सदर एसटी बस निघाली यावेळी कसारा घाटात बसच्या एक्सलेटरचं पायडल तुटलं. अशावेळी करायचं काय म्हणून दोरीच्या साहाय्याने गाडी कंट्रोल करण्यात आली. नाशिकपर्यंत चालक आणि वाहकाने देखील आपला जीव मुठीत धरून अशाच स्थितीत गाडी चालवली. दरम्यान, मेकॅनिकच्या साहाय्याने ही बस दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु बस दुरुस्त झाली नाही. दुपारच्या सुमारास बस नाशिकला पोहोचली आणि नाशिकच्या बस स्थानकातून दुसरी बस मिळवण्याचा वाहक आणि चालकाने प्रयत्न केला.

एकीकडे राज्य सरकार एसटी महामंडळाच्या बसवर “निर्णय वेगवान आणि महाराष्ट्र गतिमान” या जाहिराती चालवत आहे. तर दुसरीकडे परिवहन महामंडळाच्या बसची दयनीय अवस्था झालेली दिसत आहे. या संपूर्ण प्रकारामुळे मात्र बसमधील प्रवाशांना आनंदाने करावा लागणारा प्रवास भयभयित होऊन करावा लागत आहे.
दिल्लीची मोठी खेळी यशस्वी ठरली… लकी खेळाडूला स्थान दिले आणि KKR ने लोटांगण घातले…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed