• Sat. Sep 21st, 2024
रायगडच्या कर्जतमध्ये डंपरनं दुचाकीला चिरडलं,दाम्पत्याचा मृत्यू;दोन चिमुकली पोरकी, चालक फरार

रायगड:कर्जत तालुक्यातील भिवपुरी रेल्वे स्थानका जवळ असलेल्या रेल्वे क्रॉसिंग गेट जवळ कडावकडे जाणाऱ्या दुचाकीला मागून येणाऱ्या डंपरने धडक दिली. या धडकेत पती पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीचा जागीच तर पतीचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. डंपरची जोरदार धडक दुचाकीला बसल्याने हा अपघात झाला मोटारसायकलस्वारासह मागे बसलेली त्यांची पत्नी डंपर खाली आली. अपघातात मृत्यू झालेले दाम्पत्य कर्जत ताक्यातील जिते गावाचे आहे.योगेश जाधव वय वर्ष ३५ आणि योगिता योगेश जाधव वय वर्ष ३१ असे मृत झालेल्या दोघांचे नाव आहे.जाधव दाम्पत्यास दोन लहान मुलं आहेत. या अपघातामुळे ही मुलं पोरकी झाली आहेत. डंपर चालक हा डंपर जागीच सोडून फरार झाला आहे.

जाधव दाम्पत्य कर्जत तालुक्यातील कुंडळज येथील पाहुण्यांकडे दु:खद घटना घडल्यानं सांत्वनपरभेट देण्यासाठी गेले होते. होंडा कंपनीच्या दुचाकी क्र. एम एच, ४६. ए एम ९२०१ वरून जिते गाव येथून जात असताना सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. चिंचवळी गाव हदीतील भिवपुरी रेल्वे स्थानका जवळील असलेल्या क्रॉसिंग गेट जवळ ते आले असता, पाठीमागून येणाऱ्या दगडांनी भरलेल्या डंपर क्र. एम एच, ४६. एफ ३७७२ नं थेट दुचाकीला धडक दिली. या घटनेत दुचाकीवरी दांपत्य हे खाली पडले असता आणि त्यांच्या अंगावरून सदर दगडांनी भरलेला डंपर गेल्याने या दोन्ही पती-पत्नीचा मृत्यू झाला.

गणेशच्या डोक्यात संशयाचं भूत घुसलं, सुधाकरला उसाच्या शेताजवळ गाठलं, कोयत्यानं सपासप वार, जे घडलं ते धक्कादायक

योगेश जाधव यांना प्राथमिक उपचारासाठी रायगड हॉस्पिटल येथे नेले असता, गंभीर दुखापत असल्याने पुढील उपचारासाठी पनवेल येथील गांधी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यास सांगण्यात आलं. रायगड हॉस्पिटल येथे रुग्णवाहिकेमध्ये दाखल करत असताना त्यांचा मृत्यू झाला. तर, पत्नी योगिता जाधव यांचा जागीच मृत्यू झाला होता. मृत दाम्पत्याला दोन लहान मुलं आहेत.
जवानाला २२ व्या वर्षी वीरमरण; अंत्यसंस्कारापूर्वी आर्कविवाह; निरोप देताना कुटुंबाचा आक्रोश

रायगडमधील हरिहरेश्वरमध्ये संशयास्पद बोट, जिल्ह्यात हायअलर्ट, अदिती तटकरेंची चौकशीची मागणी

या डंपर चालकाविरोधात नेरळ पोलीस ठाण्यात ३०४ अ अंतर्गत गुन्हा दाखल झाला असुन, पुढील तपास हा नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक राजेंद्र तेंडुलकर यांचे मार्गदर्शनाखाली नेरळ पोलीस ठाण्याचे उप पोलीस निरिक्षक श्रीकांत काळे करत आहेत.
मोठी बातमी : महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात मृत्यूचे तांडव; उष्माघाताने घेतला ११ जणांचा बळी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed