प्रवीण अशोक दिनकर वाकोल्यातून जात असताना त्यांच्यापुढे असणाऱ्या बेस्टच्या बसमधून एक प्रवासी उतरत होता. त्यामुळे प्रवीण दिनकर हे बेस्ट बसच्या पाठिमागे थांबले होते. त्यावेळीच मागून बेस्टची दुसरी बस भरधाव वेगात आली. या बसचा ब्रेक लागला नाही. त्यामुळे ही बस पुढच्या बसवर जाऊन आदळली. त्यावेळी प्रवीण दिनकर हे दोन्ही बसेसच्या मधल्या भागात असल्याने ते चिरडले गेले. या अपघातात प्रवीण दिनकर हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने व्ही.एन. देसाई रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचार सुरु असताना साधारण सव्वाअकराच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे मुंबई पोलीस दलावर शोककळा पसरली आहे. सध्या पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरु आहे.
मुंबईत भीषण अपघात, दोन बेस्ट बसमध्ये चिरडून पोलीस इन्स्पेक्टरचा मृत्यू
