• Mon. Nov 25th, 2024

    राजापूर हातिवले येथील टोल नाका एका दिवसात बंद; पालकमंत्री उदय सामंतांचा महत्त्वपूर्ण निर्णय

    राजापूर हातिवले येथील टोल नाका एका दिवसात बंद; पालकमंत्री उदय सामंतांचा महत्त्वपूर्ण निर्णय

    रत्नागिरी : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती कोकणातील राजापूर हातिवले येथे सुरू करण्यात आलेला टोल एका दिवसात बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी आपण हा निर्णय घेतल्याची माहिती आज रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. आज बुधवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून हा टोल नाका बंद करण्यात आला आहे.टोल नाक्यापासून ११ किलोमीटर अलीकडे व पलीकडे आम्हाला टोल माफी मिळायला हवी अशी स्थानिकांची मागणी आहे आणि यावरून वाद आहेत. ते वाद आता समन्वयाने मिटत आले आहेत. ७५ टक्के काम पूर्ण झाल्यावर टोल सुरू करावा असा नॅशनल हायवेचा नियम आहे. पण तरीही हे काम ऐशी ते पंच्याऐशी टक्के पूर्ण झालेले असतानाही हा टोल सुरू करण्याला आपण परवानगी नाकारली आहे, असे मंत्री उदय सामंत म्हणाले.

    सावधगिरी बाळगा, काळजी घ्या! राज्यात गेल्या २४ तासांत ९ करोना रुग्णांचा मृत्यू, आज १११५ नवे रुग्ण
    हातीवले येथील टोलवसुली पूर्णपणे थांबवण्यात आल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. जोवर तेथील स्थानिकांचे समाधान होणार नाही तोपर्यंत तेथील टोल वसुली सुरू केली जाणार नाही अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

    १० दिवस उलटले, सार्थकच्या मारेकऱ्यांचे पोलिसांना अजूनही धागेदोरे सापडेनात, गावकरी संतप्त
    कोल्हापूर नॅशनल हायवे अथॉरिटीच्या व्यवस्थापनाखाली हातीवले येथील टोल नाका मंगळवारी सकाळपासून सुरू करण्यात आला होता. मात्र मुंबई गोवा हाय-वे चे काम अपूर्ण अवस्थेत असतानाही हा टोलनाका सुरू करण्यात आला. याला सर्वपक्षीय नेते व जनतेचा विरोध होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री उदय सावंत यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

    दरम्यान या संदर्भात आपण राजापूर येथे १४ तारखेला रात्री नऊ वाजता बैठक घेण्यात येत असून या संदर्भात आपण ग्रामस्थांजवळ चर्चा करणार आहोत. यातून नक्की मार्ग निघेल. यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, अशीही माहिती उदय सामंत यांनी दिली आहे.
    बारामतीत खळबळ! जमिनीच्या वादातून भावाने घेतला भावाचा बळी, नांगरणी पाहून येताना साधला डाव
    यापूर्वी २२ डिसेंबर रोजी हा टोल नका सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यावेळी टोल वसुली थांबवा अन्यथा आम्ही येथून हलणार नाही अशी आक्रमक भूमिका भाजपा युवानेते माजी खासदार नीलेश राणे यांनी घेतली होती. सिंधुदुर्गपासून रायगडपर्यंत कोणताही टोल नाका सुरू होणार नाही, तर मग हाच हातीवले टोलनाका सुरू का, असा सवाल करत यासाठी सर्वपक्षीय आंदोलन याठिकाणी करण्यात आले होते. त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवर हातीवले येथील टोल वसूलीबाबत राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने हातीविले टोल नाका सुरू करण्याचा मंगळवारी सकाळी सुरू करण्यात आल्याने नाराजी व्यक्त होत होती. पण तुर्तास दिलासा मिळाला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed