• Sat. Sep 21st, 2024
पत्रकार होता, पण डान्सबारचं व्यसन अन् चोर बनला, पकडण्यासाठी महिनाभर पोलिसांची दमछाक

कल्याण:डोंबिवली जवळील निळजे गावातील एका तरुणाने मास मीडिया कम्युनिकेशनचं शिक्षण घेतलं घेतलं. त्यानंतर एका मोठ्या वृत्तपत्रात नोकरीलाही लागला. मात्र, याच दरम्यान त्याला डान्स बारचं व्यसन लागलं. डान्सबारमध्ये पैसे उडवण्यासाठी झटपट पैसे कमवण्याच्या हव्यासापोटी तो चोरीच्या मार्गाकडे वळला. हा तरुण भरदिवसा बंद घरं हेरुन घरफोड्या करायचा.तो एकटाच चोरी करत असल्याने पोलिसांची देखील त्याचा शोध घेता-घेता महिनाभर दमछाक झाली होती. अखेर खडकपाडा पोलिसांनी सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपास करत या चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत.

टॅटू, लहान कपडे, दारु पिण्याचा हट्ट, वहिनीला परदेशी महिलांसारखं ठेवायचंय; पती अन् दिराला अटक
आरोपीचे नाव रोशन जाधव असून तो डोंबिवलीतील निळजे गाव येथे राहणारा आहे. या तरुणाने पत्रकारितेचे उच्चशिक्षण घेतले असून काही वर्षे तो एका मोठ्या इंग्रजी वृत्तपत्रात काम करत होता. त्याच्याकडून एकूण ८ गुन्हे उघडकीस आणले असून ४७ तोळे सोन्याचे दागिने, एक लॅपटॉप, एक मोबाईल फोन, दोन घड्याळ असा लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नवनिर्वाचित सरपंचाची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या; भर चौकात आधी रेकी, काहीच मिनिटांत हल्ला

खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोहने परिसरात एका घरामध्ये अज्ञात आरोपीने दिवसा घरफोडी करुन सुमारे ३५ तोळे सोन्याचे चोरी केली होती. याबाबत खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हा नोंद करण्यात आला होता. तसेच, गेल्या महिनाभरात दिवसा घरफोडी करण्याच्या घटना परिसरात सतत घडत होत्या, त्याबाबतही पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले होते.

दिवसा घरफोडी करुन चोरी करण्याच्या वाढत्या घटनांमुळे परिसरातील लोकांच्या मनामध्ये भिती निर्माण झाली होती. परिसरातील उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक कौशल्याच्या आधारे प्राप्त माहितीनुसार गुन्हा घडल्यानंतर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांनी ८ एप्रिल रोजी शहाड, कल्याण पश्चिम परिसरात सापळा रचून एका संशयित व्यक्तीला शिताफीने ताब्यात घेतलं.

भावाच्या साखरपुड्यात DJवर नाचत होता, अचानक कोसळला, कुटुंबीयांना वाटलं बेशुद्ध झाला पण..
या व्यक्तीकडे चौकशी केली असता त्याने ठाणे जिल्ह्यात मोहने, आंबिवली, टिटवाळा, शहापूर परिसरात दिवसा घरफोडी करुन गुन्हे केल्याचे सांगितले. तसेच, हा आरोपी दिवसा घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार असुन तो वॉचमन नसलेल्या इमारतीत दिवसा एकटा घुसून घरफोडी करत असे. अटक आरोपीताकडून नमूद केलेले एकूण ८ गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्याच्याकडून ४७ तोळे (४७० ग्रॅम) सोन्याचे दागिने, १ लॅपटॉप, १ मोबाईल फोन, दोन महागडी घड्याळ हस्तगत करण्यात खडकपाडा पोलीस ठाण्यास यश मिळाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed