मुंबई : ‘मेट्रो २ अ’ च्या तीन स्थानकांचे अखेर नामांतरण करण्यात आले आहे. त्यामध्ये पहाडी एकसर, वळनई व पहाडी गोरेगाव, या स्थानकांचा समावेश आहे. मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) यासंदर्भात परिपत्रक काढले आहे.‘मेट्रो २ अ’ या मार्गिकेचा दुसरा टप्पा जानेवारीत सुरू झाला. मार्गिकेतील ‘पहाडी गोरेगाव’ स्थानकाचा परिसर वास्तवात ‘बांगूरनगर’ जवळ असून त्याच नावे ओळखला जातो. त्यामुळे तेच नाव या स्थानकाला दिले जावे, अशी मागणी स्थानिकांनी केली होती.
तसेच या मार्गिकेवर पुढील स्थानक हे ‘लोअर मालाड’ आहे. त्यानंतरचे स्थानक ‘मालाड पश्चिम‘ असे असताना ‘लोअर मालाड’ या नावाची गरज नाही. त्या भागाला स्थानिक रहिवासी ‘कस्तुरी पार्क’ म्हणून ओळखतात. त्यामुळे तेच नाव या दोन स्थानकांना द्यायला हवे, अशी मागणी स्थानिकांच्यावतीने विविध राजकीय पक्ष तसेच अन्य नागरिकांनी केली होती. त्यासाठी स्वाक्षरी मोहिमदेखील राबविण्यात आली होती.

या मागणीची दखल घेत ‘पहाडी गोरेगाव’ स्थानकाचे नामांतरण ‘बांगूरनगर’ करण्यात आले आहे. दरम्यान ‘लोअर मालाड’चा निर्णय अद्याप झालेला नाही.
पहाडी एकसर स्थानक शिंपोली नावाने ओळखले जाणार
दुसरीकडे बोरिवली पश्चिमेला असलेले ‘पहाडी एकसर’ हे स्थानक शिंपोली परिसरात आहे. त्याच नावे तो भाग ओळखला जातो. त्यामुळे हे नाव बदलले जावे, अशी मागणी तेथील श्री गावदेवी ग्रामस्थ मंडळाने केली होती. त्यानुसार अखेर ‘पहाडी एकसर’ हे स्थानक आता ‘शिंपोली’ म्हणून ओळखले जाणार आहे. तर ‘वळनई’ स्थानकाचे नामांतरण ‘वळनई-मीठ चौकी’ असे करण्यात आले आहे. वास्तवात या नामांतराची मागणी वेगळी होती.