सोमवारी पहाटेच्या सुमारास धामणगाव रोडने यवतमाळकडे येत असताना वनविभागाच्या नगरवन जवळ, बिडकर फार्म येथे चारचाकी वाहनात आलेल्या सहा ते सात अज्ञात इसमांनी त्यांना अडवून चाकूचा धाक दाखवित लुटले. फिर्यादीच्या खिशातील तीन हजार तर क्लिनरच्या खिशातून दोन हजार, १४ हजाराचा मोबाइल, ५०० रुपयाचे किपॅड हिसकावून एम. पी. ४८ एचओ ७८८ क्रमांकाचा १२ लाखाचा ट्रक आणि १० लाखाची २५ टन साखर असा एकूण २२ लाख १९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी पळविला.
याबाबत शहर ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलिसांनी गुन्हा नोंद केला. दरोडेखोरांच्या अटकेसाठी आठ पथके गठित करण्यात आली. शहर ठाण्यासह एलसीबीने हायवे पोलिसांना तसेच लगतच्या जिल्ह्यात आदेश देऊन नाकाबंदी करण्यात सांगितले. शहर ठाणे व एलसीबीचे आठही पथके विविध दिशेने रवाना झाले. शहर पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेत कसून चौकशी केली. त्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तीन आरोपींच्या अटकेमुळे दरोड्याचे नागपूर-यवतमाळ कनेक्शन उघड झाले. उपराजधानीतच या दरोड्याचा कट शिजला होता, अशी माहिती आता समोर आली आहे.
चार पसार आरोपींचा चार पथकांकडून शोध सुरू आहे. वरोरा एमआयडीसीतून साखरेचा ट्रक जप्त सशस्त्र दरोडा घालून २५ टन साखरेचा ट्रक घेवून दरोडेखार पसार झाले.
त्यांनी वरोरा येथील एमआयडीसी परिसरात कुणाच्याही लक्षात येणार नाही, अशास्थितीत ट्रक उभा केला. मात्र एलसीबीसह यवतमाळ शहर ठाण्याच्या पथकांनी ट्रकचा माग काढून वरोरा गाठले. एमआयडीसी परिसरात ट्रक दिसताच पथकाने पाहणी केली. त्यानंतर खात्री पटल्यानंतर ट्रक आणि साखर असा २२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक पीयूष जगताप, एसडीपीओ संपतराव भोसले यांचे मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक विनायक कोते, दिनेश भैसाने, एलसीबी प्रमुख पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, शहरचे ठाणेदार नंदकिशोर पंत, एपीआय सचिन लुले, एपीआय जर्नादन खंडेराव, एपीआय विवेक देशमुख, पीएसआय राहुल गुहे, संतोष व्यास, भरत राठोड, किरण पडघन, रवी नेवारे, अंकुश फेंडर, सुनील पैठणे, राजू कांबळे, मिलिंद दरेकर, साजीद सय्यद, अजय डोळे, बंडू डांगे, रुपेश पाली, विनोद राठोड, निलेश राठोड, रितुराज मेडवे, धनंजय श्रीरामे, चालक विवेक पेठे, सायबर सेल आदींनी केली.