• Sat. Sep 21st, 2024
छ. राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणूक, रात्री १२ वाजता मोठा निर्णय, सतेज पाटलांना धक्का

कोल्हापूर : सध्या कोल्हापुरात श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सतेज पाटील विरुद्ध महाडिक असा सामना रंगलेला पाहायला मिळत आहे. अशातच सतेज पाटील गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. निवडणुकीत राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्या २९ उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध ठरवल्याच्या विरोधात प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्याकडे दाखल केलेले अपील नामंजूर करण्यात आले आहे. याबाबत निकालाच्या प्रति रविवारी रात्री १२ वाजताच संबंधितांना देण्यात आल्याने सतेज पाटील यांना निवडणुकीत धक्क्यांवर धक्के बसत आहेत.श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक सध्या लागली असून या निवडणुकीत सतीश पाटील विरुद्ध महाडिक असा पारंपारिक सामना सुरू आहे. गेल्या २५ ते ३० वर्षाहून अधिक काळ महाडिक यांची सत्ता असलेल्या राजाराम कारखान्यात परिवर्तन घडवून आणण्याच्या प्रयत्नात आमदार सतेज पाटील आहेत. यंदा कंडका पाडायचा या टायटल खाली जोरदार प्रचार सुरू आहे. मात्र महाडिक गटाकडून देखील आपली सत्ता टिकवण्यासाठी जोरदार प्रचार सुरू आहे.

एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या झाडाझडती होत आहेत. अशातच कारखान्याच्या कराराचा भंग केला असे म्हणत सतेज पाटील यांच्या राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्या २९ उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी यांनी २९ मार्च रोजी त्यांना अपात्र ठरवले होते. याचा सतेज पाटील यांना मोठा धक्का बसला होता.

या निर्णयाविरोधात सतेज पाटील गटाने प्रादेशिक सहसंचालक (साखर) कोल्हापूर विभाग, कोल्हापूर यांच्याकडे ३१ मार्च रोजी अपील दाखल केले होते. तसेच लाखभर कागदपत्रे देखील पुरावा म्हणून सादर केले होते. यावर मंगळवार ४ व गुरुवार ६ एप्रिल रोजी सुनावणी पूर्ण झाली. अपील दाखल झाल्या तारखेपासून दहा दिवसात यावर निर्णय देणे बंधनकारक असल्याने याचे पालन करत प्रादेशिक सहसंचालक (साखर) कोल्हापूर विभाग कोल्हापूर यांनी रविवार काल रात्रीच १२ वा. संबंधितांना निकालाच्या प्रती पोहोचवत अपील नामंजूर केली आहे. यामुळे सतेज पाटील यांना निवडणुकीत दुसऱ्यांदा धक्का बसला आहे.
सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन यांच्या समुद्रकिनाऱ्यावरील बंगल्यातील अतिरिक्त बांधकामाला सीआरझेची परवानगी
या निर्णयाविरोधात सतेज पाटील गटाचे राजश्री शाहू परिवर्तन आघाडी उच्च न्यायालयात जाणार आहे. सध्या राजाराम कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून बुधवार दिनांक १२ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस असून गुरुवार १३ एप्रिल रोजी अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध होणार आहे. तर २३ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे आमदार सतेज पाटील आता काय भूमिका घेणार याकडे मतदार सभासदांचे लक्ष लागले आहे.

मुंबई तापली! कमाल तापमान वाढतेच; पुढचे ४ दिवस अधिक उष्णतेचे, वाचा इतर जिल्ह्यांची स्थिती…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed