वर्सोवा ते पालघरपर्यंत बनवणारा हा मुंबईतील तिसरा सी लिंक असणार आहे. वांद्रे ते वरळीदरम्यान ५.६ किलीमीटर लांबीचा एक सीलिंक २०१०मध्ये तयार करण्यात आला होता. या पुलावरुन रोज हजारो वाहनांचा प्रवास होतो. तर, वांद्रे ते वर्सोवापर्यंत १७ किलोमीटर लांबीच्या सीलिंकचे काम प्रगतीपथावर आहे. ८ लेन असलेल्या यापुलासाठी ११ हजार ३३२ कोटींचा खर्च येणार आहे. हे तिन्ही सी लिंक एकमेकांना जोडण्याची सरकारची योजना आहे.
तिसऱ्या सी लिंकचे काम सरकारने दोन टप्प्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात वर्सोवा ते वसई आणि दुसऱ्या टप्प्यात वसई ते विरारपर्यंत नेण्याची योजना होती. मात्र आता ते वाढवून पालघरपर्यंत नेण्यात येणार आहे. वाहन चालकांच्या सुविधांचाही पूर्ण विचार करण्यात येणार आहे. संपूर्ण मार्गात चार कनेक्टर तयार करण्यात येणार आहेत. पूल तयार झाल्यानंतर प्रवासांचा अर्धा वेळ वाचणार आहे.
असा असेल सी लिंक
वर्सोवा-पालघर हा मार्ग एकूण ४२.७५ किलोमीटरचा असेल. या मार्गिकेवर चारकोप, मिरा- भाईंदर, वसई, विरार असे चार कनेक्ट असतील. या चारही ठिकाणांहून सागरी सेतू जोडला जाणार आहे. सागरी किनाऱ्यापासून एक किलोमीटरवर हा मार्ग असेल. अंधेरी पश्चिम ते विरारला ही मार्गिका संलग्न असेल. गोराई, उत्तन, वसई व विरार येथे चार टोल प्लाझा असतील. तसेच या मार्गिकेपासून वसईपर्यंत १८.४६ किमीचा विशेष रस्ताही प्रस्तावित आहे.
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ ; एकाच रिक्षात १५ ते २० विद्यार्थ्यांना कोंबून प्रवास