तो प्रवासी हा नागपूरचा रहिवासी आहे. ३१ मार्च रोजी बाजारगाव येथून ७६०६ क्रमांकाच्या एसटी बसमध्ये चढला. ही बस वर्धमान नगर आगाराची होती. प्रवासादरम्यान बस चालकाने कानात हेडफोन लावून बोलायला सुरुवात केली. एका प्रवाशाने त्याचा व्हिडिओ बनवला.
या फुटेजसोबत त्यांनी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रारही लिहिली. यासोबतच बसचे तिकीटही जोडण्यात आले. याप्रकरणी नागपूर विभागाचे वरिष्ठ सुरक्षा व दक्षता अधिकारी यांनी तातडीने चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे सांगितले.
एसटी बसच्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
या व्हिडिओमुळे एसटी बसच्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाहन चालवताना ड्रायव्हरच्या चुकीची किंमत आपल्याला रोज समोर येत असलेल्या अपघातांच्या बातम्यांवरून कळू शकते. वाहन चालवताना निष्काळजीपणामुळे अनेकांच्या संपूर्ण कुटुंबाचे मोठे नुकसान झाल्याची अनेक उदाहरणेही आपल्याला माहिती आहेत. चालक वाहन नियमांचे पालन करत नसल्याचं देखील अनेक वेळा समोर आले आहे.फोनवर बोलत असताना मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे बस चालविताना चालकाला गळ्यात हेडफोन व मोबाइल बाळगण्यास मनाई करावी काय,..? असा प्रश्न ही उभा होतो.