• Mon. Nov 25th, 2024

    गौतमी पाटील कार्यक्रमासाठी पोहोचली पण सादरीकरण हिंदवी पाटीलनं केलं, अन्नापूरमध्ये काय घडलं?

    गौतमी पाटील कार्यक्रमासाठी पोहोचली पण सादरीकरण हिंदवी पाटीलनं केलं, अन्नापूरमध्ये काय घडलं?

    पुणे : पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील अन्नापूर येथे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला शिरूर पोलिसांनी परवानगी नाकारली. यामुळं कार्यक्रम रद्द करण्याची वेळ आयोजकांसह गौतमी पाटीलवर आली असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानं ऐनवेळी गौतमी पाटील ऐवजी तिचीसहकारी हिंदवी पाटील हिच्या नृत्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी गौतमी पाटील हिनं कार्यक्रमस्थळी उपस्थित राहून प्रेक्षकांची जाहीर दिलगिरी व्यक्त केली. तसंच पुढील महिन्यात त्याच ठिकाणी कार्यक्रम घेण्याचा शब्द देखील दिला.

    अन्नापूर येथे हनुमान जयंती निमित्त गौतमी पाटील च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, पुणे ग्रामीण पोलिसांनी परवानगी नाकारल्याने आयोजकांवर आणि गौतमी पाटीलचा कार्यक्रम रद्द करण्याची आयोजकांवर वेळ आली.

    अन्नापूर हे शिरूर तालुक्यातील महत्वाचे गाव आहे. या गावाला तमाशा होण्याची परंपरा आहे. मात्र, तमाशाच्या कार्यक्रमात अनेकदा भांडण, राडे होत असतात. आतापर्यंत घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली. यामुळं आयोजकांवर गौतमी पाटीलची सहकरी हिंदवी पाटील हिच्या कार्यक्रमाचे आयोजन करावे लागले.

    यावेळी कार्यक्रमस्थळी गौतमी पाटील देखील उपस्थित होती. कार्यक्रमाला येऊनही तिनं सादरीकरण केलं नाही. हनुमान जयंतीच्या कार्यक्रमात कुठलाही गोंधळ होऊ नये यासाठी पोलिसांनी परवानगी नाकारल्याचे समजले आहे.

    अखेर तुरीच्या दराच्या वाढीचा ट्रेंड, ४०५ रुपयांची वाढ, शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, तूर नऊ हजारांचा टप्पा गाठणार?

    गौतमी पाटील हिने यावेळी कार्यक्रम स्थळी हजेरी लावून प्रेक्षकांशी संवाद साधला. गौतमीनं काही कारणांमुळं सादरीकरण करता येत नसल्यानं दिलगिरी व्यक्त केली. अन्नापूरची मुलगी म्हणून इथे आले असून मी काही कारणामुळे कार्यक्रम करू शकत नाही, मात्र पुढच्या वेळी नक्की मी डान्स करेल असे आश्वासन देखील गौतमी पाटील हिने प्रेक्षकांना दिले.

    युवा शेतकऱ्याची अफलातून आयडिया, खेकडा पालनाचं धाडस सक्सेसफुल ठरलं, महिन्याला लाखो रुपयांची कमाई

    दरम्यान, गौतमी पाटील हिनं काही दिवसांपूर्वी कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी केलेल्या वक्तव्यावर भूमिका स्पष्ट करुन वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. तीन गाण्यांना तीन लाख रुपये घेत नसल्याचं तिनं म्हटलं होतं.

    आशिष देशमुख राष्ट्रवादीच्या वाटेवर? काँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चा, विधानसभा निवडणुकीचं प्लॅनिंग सुरु

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *