• Sat. Sep 21st, 2024

शाळेत गेलेल्या मुलाला आणायला रस्त्यावर का गेलीस?, क्षुल्लक कारणावरून पतीने पत्नीचा गळा घोटला

शाळेत गेलेल्या मुलाला आणायला रस्त्यावर का गेलीस?, क्षुल्लक कारणावरून पतीने पत्नीचा गळा घोटला

बुलडाणा : क्षणाचा राग आणि क्षुल्लक कारण किती टोकाचा परिणाम घडवू शकतात याचा आपण विचारही करू शकणार नाही. बुलडाण्यातील देऊळगाव येथील पती-पत्नीमध्ये घडलेल्या प्रकार याचेच उदाहरण आहे. मुलाला रस्त्यावर आणायला गेल्यानं पतीला राग अनावर झाला व त्याने पत्नीचा गळा घोटला. देऊळगाव राजा येथे ही घटना घडली.शाळेत गेलेल्या मुलाला आणायला रस्त्यावर का गेलीस या कारणावरुन पतीने पत्नीशी वाद घातला. त्यानंतर पतीने पत्नीचा गळा आवळून खून केला. ही घटना ३ एप्रिल रोजी घडली.

याप्रकरणात आधी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, शवविच्छेदन अहवालानंतर आरोपी पतीविरुद्ध ५ एप्रिल रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

IPL 2023: नशिबाने मिळाले प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान, डेव्हिड विलीने मैदानात येताच केली कमाल
देऊळगाव राजा शहरातील शिवाजी पार्क भागात राहणारा आरोपी सुनील भास्कर गीते (वय ३५ वर्षे) याने ३ एप्रिल रोजी त्याची पत्नी शिवकन्या सुनील गीते (वय २५ वर्षे) हिच्यासी सकाळी साडेदहा वाजता शाळेतून येणाऱ्या मुलाला आणायला रस्त्यावर का गेली ? या कारणावरुन वाद घातला. दरम्यान त्याने शिवकन्या गिते यांचा गळा आवळून खून केला. याप्रकरणात पोलिसांनी आधी आकस्मिक मृत्यूची नोंद करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून तपास सुरु केला होता.

पत्नीचे शेजाऱ्याशी अनैतिक संबंध, पतीला कळताच तळपायाची आग मस्तकात, पुढे घडलं ते हादरवणारं
पत्नीचा गळा आवळून खून केल्याचे झाले स्पष्ट

याप्रकरणाचा तपास करणारे सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय वाघमारे यांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन संशयित आरोपी पतीचा जवाब नोंदविला होता. मात्र प्रतीक्षा होती शवविच्छेदन अहवालाची. दरम्यान ५ एप्रिल रोजी शवविच्छेदन अहवाल प्राप्त होताच शिवकन्या गिते यांचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे समोर आले. पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी सुनील गीते यांनी खुनाची कबुली दिली.

संतापाच्या भरात तरुण घरातून निघाला, खूप शोध घेतला, ३ दिवसांनी आली धक्कादायक बातमी
सुनीलला न्यायालयापुढे हजर केले गेले

आरोपी सुनील गिते यास अटक करण्यात आली असून, त्यास आज न्यायालयापुढे हजर केले गेले. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक जयवंत सातव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय वाघमारे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed