• Sat. Sep 21st, 2024
गप बसा रे, गौतमी पाटीलच्या डान्सवेळी माईकवरुन आवाहन, अखेर हुल्लडबाजांना काठीचा प्रसाद

सोलापूर : लावणी नृत्यांगना गौतमी पाटील हिचे डान्स कार्यक्रम म्हणजे पोलिसांना डोकेदुखी झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर तालुक्यातील वेळापूर येथील अर्धनारी नटेश्वर यात्रा समितीच्या वतीने पालखी मैदानावर गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी माळशिरस आणि पंढरपूर तालुक्यातील गौतमीचे चाहते हजारोंच्या संख्येनं या पालखी मैदानावर जमा झाले होते. कार्यक्रम सुरु झाल्यानंतर दुसऱ्याच गाण्याला प्रेक्षकांतून हुल्लडबाजी सुरू झाली. आयोजकांनी आवाहन केले तरी प्रेक्षक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते, अखेर पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. गौतमीचं गाणं मध्येच थांबवून पोलिसांनी प्रेक्षकांना शांतता बाळगण्याचं आवाहन केलं. पण तरीदेखील हुल्लडबाजी सुरूच राहिल्यानं पोलिसांना अॅक्शन मोडवर यावे लागले. कार्यक्रमाचे आयोजक व राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांनी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच गोंधळ न करण्याच्या सूचना दिल्या होत्या, मात्र अतिउत्साही रसिकांची हुल्लडबाजी सुरूच होती.

महाराष्ट्रा बाहेर कार्यक्रम घेण्याच विचार नाही

गौतमी पाटीलच्या अदाकारीवर संपूर्ण महाराष्ट्र फिदा झाला आहे. सोशल मीडियावर तिच्या रिल्स आणि व्हिडिओला देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. गौतमीचे कार्यक्रम आपल्याही राज्यात व्हावेत यासाठी परराज्यातील आयोजक धडपड किंवा प्रयत्न करू लागले आहेत. याबाबत गौतमी पाटीलला प्रश्न विचारताच तिने अशी मागणी येत असली तरी अजून महाराष्ट्रबाहेर कार्यक्रम करण्याबाबत विचार केला नसल्याचे सांगितले आहे.
ट्रेनमधील महिलांचे लपून व्हिडिओ शूट, सिंहगड एक्स्प्रेसमध्ये तरुणाला सहप्रवाशांनी धुतलं

मी पण इंदुरीकर महाराजांची फॅन

मानधनावरून इंदोरीकर महाराज यांनी केलेल्या टिप्पण्णीवर देखील गौतमीने खुलासा केला आहे. महाराजांचा कोणी तरी गैरसमज करून दिल्याचे सांगितले. माझे मानधन नक्कीच तेवढे नाही, माझ्याबाबत सातत्याने असे गैरसमज पसरवले जात असल्याचे तिने सांगितले. मी देखील इंदुरीकर महाराजांची फॅन आहे असे गौतमीने स्पष्टच सांगितले आहे.

तीन गाण्यांसाठी तीन लाख, इंदुरीकरांच्या दाव्यावर गौतमी पाटील म्हणते, गैरसमज करु नका, पण…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed