भारतीय महिला संघाची उपकप्तान आणि सलामीची फलंदाज स्मृती मानधनाने बी. कॉम प्रथम वर्षासाठी कोल्हापुरातील हातकणंगले तालुक्यातील संजय घोडावत विद्यापीठ येथे प्रवेश घेतला असल्याची माहिती विश्वस्त विनायक भोसले यांनी दिले आहे. तसेच स्मृतीने तिच्या शिक्षणासाठी आमच्या विद्यापीठाची निवड केली ही आमच्यासाठी अभिमानास्पद बाब असल्याचंही ते म्हणाले. तिच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आम्ही सर्वोत्तरी प्रयत्न करू असेही ते यावेळी म्हणाले आहेत.
स्मृती मानधनाचे स्वागत संस्थेचे चेअरमन संजय घोडावत यांनी स्वतः उपस्थित राहून पुष्पगुच्छ देत केले. कोल्हापूर जिल्ह्यात संजय घोडावत विद्यापीठ असून विस्तीर्ण अशा परिसरात विविध विषयाचे शिक्षण दिले जाते. येथील खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळवण्यासाठी विद्यापीठाकडून नेहमीच पाठबळ दिले जात असते. अशातच स्मृती मानधना यांनी घोडावत विद्यापीठात प्रवेश घेतल्याने विद्यापीठाच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवल्याची भावना संजय घोडावत यांनी व्यक्त केली.
मार्क वूड ठरला IPL 2023 मधील ५ विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज !
तसेच यापूर्वी देखील १८ वर्षाखालील गटात लॉन टेनिस प्रकारात आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणाऱ्या ऐश्वर्या जाधवला आम्ही प्रवेश देऊन तिला सर्वतोपरी मदत करत आहोत. यामुळे सामान्यातला सामान्य खेळाडू देखील क्रीडापटू ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत आणि यामुळे विद्यापीठाची वाटचाल सर्वोत्कृष्टतेकडे होत असल्याचे समाधान घोडावत यांनी व्यक्त केले आहे. यावेळी घोडावत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.अरुण पाटील, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे, घोडावत पॉलिटेक्निकचे प्राचार्य विराट गिरी, वाणिज्य आणि व्यवस्थापन अधिष्ठाता डॉ. योगेश्वरी गिरी आदि जण उपस्थित होते.