• Mon. Sep 23rd, 2024

धक्कादायक! नवा बॉयफ्रेंड बनवल्याने प्रियकर भडकला, भेटण्याच्या बहाण्याने प्रेयसीचा काढला काटा

धक्कादायक! नवा बॉयफ्रेंड बनवल्याने प्रियकर भडकला, भेटण्याच्या बहाण्याने प्रेयसीचा काढला काटा

पिंपरी:पिंपरी चिंचवड येथील चिखली परिसरातून तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेली अल्पवयीन मुलीचा खून झाल्याचे समोर आले आहे. अल्पवयीन मुलीने दुसरा बॉयफ्रेंड बनवल्याच्या रागातून हा खून झाल्याचे समोर आले आहे. मुलीच्या मृतदेहावर वार केल्याच्या खुणा मिळाल्या असून पोलिसांनी या. प्रकरणात तात्काळ दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. मंगळवारी ही घटना उघडकीस आली होती. चिखली, घरकलू परिसरातील सांस्कृतिक भवनच्या चालू बांधकाम साईटवर घडली. महिलेने रविवारी मुलगी हरवल्याची तक्रार चिखली पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास करत आरोपींना ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्याद दिलेल्या महिलेची मुलगी ही अल्पवयीन आहे. बाहेर जाते असून ती घरात सांगून बाहेर पडली होती. मात्र बराच वेळ होऊनही ती परत आली नसल्याने त्या मुलीच्या आईने चिखली पोलिसात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी तत्काळ सूत्रे हलवत मुलीला शोधण्याचा प्रयत्न सुरू केले. चिखली परिसरातच शोधाशोध केल्यानंतर त्या मुलीचा मृतदेह पोलिसांना मिळाला. त्या मृतदेहावार धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा दिसत होत्या.

दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक, भीषण अपघातात पोलीस कर्मचारी ठार, क्षणात होत्याचे नव्हते
पोलिसांनी मुलीच्या मोबाईल सीडीआरवरून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यातील एकाने संबंधित तरुणीने दुसर बॉयफ्रेंड बनवला होता. त्याचा राग त्याच्या मनात होता. त्यामुळे तिला भेटायला बोलावण्याचा बहाण्याने तिच्यावर कोयत्याने सपासप वार करून तिचा खून केला.

पोलीस कर्मचाऱ्याचा हलगर्जीपणा; बंदूक हाताळताना अचानक दाबला गेला ट्रिगर, गोळी सुटली आणि…
या घटनेने चिखली परिसर हादरून गेला होता. अल्पवयीन मुलांनी असे कृत्य करणे म्हणजे चुकीची बाब आहे. अल्पवयीन मुलांनी या वयात चांगला अभ्यास करून आपल्या भवितव्यकडे लक्ष देणे तेवढेच गरजेचे आहे. मात्र अशा घटनमुळे समाजात जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे बोलले जात आहे.

महिलांनी लाटल्या साडे तीन लाख पुऱ्या, १ हजार किलो कांद्याची चटणी ; पुण्यातील या गावात केला जातो महाप्रसाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed