• Sat. Sep 21st, 2024

४ लेकरांना सोडून बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने सासऱ्याला शिक्षा दिली, पाच दिवसांनी…

४ लेकरांना सोडून बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने सासऱ्याला शिक्षा दिली, पाच दिवसांनी…

जालना: सासरा मुलीला नांदायला पाठवत नाही, या संशयातून २९ तारखेला अंबड शहरात किशोर पवार याने आपल्या सासऱ्यावर २ गोळ्या झाडून खून केला होता. चार लेकरांची आई असलेली पत्नी प्रियकरासोबत पळून गेली. तिला सासऱ्याचीच फुस असल्याचा संशय डोक्यात असल्यामुळे संतप्त झालेल्या जावयाने सासऱ्याचा बंदुकीने गोळ्या झाडून खून केला होता.ही घटना जालना जिल्ह्याच्या अंबड शहरातील शारदानगर येथे २९ मार्च रोजी घडली होती. अंबड शहरातील शारदानगर येथे वास्तव्यास असलेल्या पंडित भानुदास काळे असे या घटनेत बळी गेलेल्या मृताचे नाव आहे. घटनेच्या पाच दिवसानंतरही पोलिसांना आरोपी सापडले नाही. संशयितांनी फोन बंद करून ठेवल्याने त्यांचा शोध लागत नसल्याचे सांगण्यात आले आहे.

पत्नीकडून झाली मोठी चूक; पतीने भरदिवसा सासऱ्याचा काटा काढला; पहिली गोळी डोक्यात तर दुसरी..
२९ मार्च रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास पंडित काळे आणि त्यांचा मुलगा पारलेश काळे हे दोघे शारदानगर येथील घरी बसले होते. त्याचवेळी संशयित किशोर पवार, नितीन जाधव दोघे रा. आडूळ, तालुका पैठण आणि एक अनोळखी व्यक्ती हे एकच दुचाकीवरून आले. ‘माझी बायको नांदायला का पाठवत नाही,’ असे म्हणून तिघांनी पंडित काळे यांना शिवीगाळ केली. तर किशोर पवार याने काळे यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. यात पंडित काळे यांचा मृत्यू झाला होता.

बार्शीतील निर्भया प्रकरणाची महिला आयोगाकडून दखल; रुपाली चाकणकरांचा फोन पीडित कुटुंबाला फोन करून धीर

या घटनेने अंबड शहरात एकच खळबळ उडाली होती. घटनेचे गांभीर्य पाहता पोलिसांनी घटना स्थळावर तत्काळ धाव घेत गुन्ह्याचा तपास सुरू केला होता. दरम्यान, या घटनेला जवळपास पाच दिवसांचा कालावधी झाला आहे. मात्र, अद्यापही पोलिसांना आरोपी सापडले नाहीत. आरोपींनी फोन बंद करून ठेवल्याने अडचणी येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

वडील इलेक्ट्रिशियन, क्रिकेट किटसाठी उधारी; कोचचा आधार, आता मुलाची IPL मध्ये धडाकेबाज कामगिरी
खून प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी पथक तैनात करण्यात आले आहे. आरोपींनी मोबाईल बंद करून ठेवल्याने त्यांचा शोध घेण्यात अडचणी येत आहेत. लवकरच त्यांना ताब्यात घेऊ अशी माहिती अंबड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed