• Sat. Sep 21st, 2024
उड्डाणपुलावरुन बाईकसह खाली कोसळला, पुणे-बंगळूर महामार्गावर तरुणाचा मृत्यू

सातारा : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील रायगाव फाट्याजवळ दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने उड्डाणपुलावरून दुचाकीसह कोसळून युवकाचा जागीच मृत्यू झाला. सुनील गंगाराम गावडे (३४) असे त्याचे नाव आहे. तर अन्य घटनेत मित्रांसमवेत गोडोली येथे विहिरीत पोहोयला गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाला. सुजल अजय सणस (वय २६) असे विहिरीत बुडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.पोलिसांनी सांगितले की, सुनील गंगाराम गावडे (वय ३४, कानुखुर्द, ता. चंदगड, रा. जि. कोल्हापूर) असे उड्डाणपुलावरून कोसळून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. चंदगडहून दुचाकीवरून पुण्याला जात असताना उड्डाणपुलावरून कोसळून त्याचा मृत्यू झाला.

सुनील गावडे हा पुणे येथे नोकरी करत होता. काही दिवसांपूर्वी तो गावी आला होता. रविवारी दुपारी तो दुचाकीवरून चंदगडहून पुण्याला निघाला होता. रायगाव फाट्यावर आल्यानंतर त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. उड्डाणपुलावरून तो दुचाकीसह खाली कोसळला. यात त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला. सातारा तालुका पोलिस ठाण्यात अपघाताची रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.

दरम्यान, सातारा शहरातील दुसऱ्या घटनेत मित्रांसमवेत पोहोयला गेलेल्या युवकाचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गोडोली येथे घडली. सुजल अजय सणस (वय २६, रा. शिंदे कॉलनी शाहूनगर सातारा. मूळ रा. रेनावळे, ता. वाई) असे विहिरीत बुडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

प्रेयसी म्हणाली घरच्यांना सोड, अक्षयची नदीत उडी; पण ८ महिन्यांपासून थांगपत्ता नाही, तो अजूनही जिवंत?
पोलिसांनी सांगितले की, सुजल याने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती. रविवारी दुपारी तो मित्रांसमवेत विहिरीमध्ये पोहायला गेला होता. त्याला फारसे चांगले पोहता येत नव्हते. विहिरीत पोहत असतानाच तो गटांगळ्या खाऊ लागला. हा प्रकार त्याच्या मित्रांच्या निर्दशनास आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली. मात्र, तोपर्यंत तो बुडाला.

मी मंदिरात उभा आहे तोपर्यंत चुकीचं होऊ देणार नाही; इम्तियाज जलीलांची ग्वाही

या प्रकारानंतर शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्सच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन सुजलचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. त्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या दोन्ही घटनेची रात्री उशिरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली नव्हती.

ड्युटीवर निघाली पण पोहोचलीच नाही, २६ वर्षीय तरुणीचा ट्रेनमधून पडून दुर्दैवी मृत्यू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed