• Sat. Sep 21st, 2024
लोकसभेला अवघं एक वर्ष, गिरीश बापटांच्या निधनानंतर पुण्यात पोटनिवडणूक होणार की नाही?

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार गिरीश बापट यांचे काल निधन झाले. दुर्धर आजारासोबत वर्षभरापासून सुरु असलेली झुंज अपयशी ठरल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. कुटुंबीय, समर्थक आणि सर्वपक्षीय दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. बापटांच्या निधनाने पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होऊ शकेल का? असा सवाल आता उपस्थित होत आहे. लोकसभा निवडणुकांना जेमतेम वर्षभराचा कालावधी शिल्लक आहे, अशा परिस्थितीत ही जागा रिक्तच राहील की तिथे पोटनिवडणूक होईल, असा प्रश्न विचारला जात आहे.

१९५१ सालच्या 151 A लोकप्रतिनिधी कायद्यानुसार जर लोकसभा किंवा विधानसभेची मुदत संपण्यास एक वर्षाचा कालावधी बाकी असेल, तर पोटनिवडणूक घ्यावी लागते. लोकसभा निवडणूक २०२४ मधील एप्रिल-मे महिन्यात अपेक्षित आहे. सध्या मार्च महिना संपत आल्यामुळे एक वर्षाहून अधिक काळ शिल्लक आहे. त्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घ्यावी लागेल. महत्त्वाचं म्हणजे ही पोटनिवडणूक ६ महिन्यांच्या आत घ्यावी लागेल.

उमेदवारी कोणाला?

नुकतेच भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर झालेल्या पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपने टिळक कुटुंबीयांना उमेदवारी दिली नव्हती. त्यामुळे भाजपला जनतेच्या रोषालाही सामोरं जावं लागलं होतं. अनेक वर्ष गिरीश बापटांनी भाजपकडे राखलेला गड काँग्रेसकडे गेला. टिळक परिवारात तिकीट दिलं असतं, तर सहानुभूतीचा फायदा झाला असता, अशी चर्चा होती. अशा परिस्थितीत पुणे लोकसभा पोटनिवडणुकीत भाजप कोणाला उमेदवारी देणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

गिरीश बापटांच्या निधनाने पुण्यातील पोकळी भरुन निघणार नाही, राष्ट्रवादीचा नेता ढसाढसा रडला
गिरीश बापट यांच्या स्नुषा स्वरदा केळकर-बापट निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास उत्सुक असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजप या पोटनिवडणुकीचं तिकीट त्यांच्या सूनबाईंना देऊन निवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन करण्याची शक्यता आहे. गिरीश बापटांचे सर्वपक्षीयांशी असलेले मधुर संबंध आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीला उरलेला अल्प कालावधी पाहता ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु भाजपमधून पुणे लोकसभेसाठी संजय काकडे, अनिल शिरोळे, मुरलीधर मोहळ यांची नावं शर्यतीत असल्याचं बोललं जातं.

शरद पवारांना मोठा दिलासा, राष्ट्रवादीच्या नेत्याची रद्द केलेली खासदारकी पुन्हा बहाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed