• Sat. Sep 21st, 2024
डिसले गुरुजी साडेतीन महिन्यात शाळेत रुजू,अहवाल न दिल्यानं सोलापूर जिल्हा परिषदेपुढं नवा पेच

सोलापूर: ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते रणजितसिंह डिसले हे अमेरिकेत जाऊन परत आल्यानंतर सोलापूर जिल्हा परिषद शाळेत ड्युटीवर रुजू झाले आहेत.याबाबत शिक्षण अधिकारी संजय जावीर यांकडे अधिक माहिती घेतली असता,डिसले गुरुजींनी अमेरिकेत जाऊन आल्यापासून कोणताही अहवाल दिला नाही. मात्र, ते ड्युटीवर हजर आहेत, अशी माहिती दिली. रणजितसिंह डिसले यांनी अमेरिकेत जे शिक्षण घेऊन आलेत ,त्याचा लाभ आम्ही सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मिळवून देऊ असा विश्वास संजय जावीर यांनी व्यक्त केला. रणजितसिह डिसले यांनी सोलापूर जिल्हा परिषदेला कसलीही माहिती दिली नाही.अमेरिकेत जाऊन काय शिक्षण घेतले,सोलापुरातील किंवा भारतातील विद्यार्थ्यांना याचा कसा फायदा होईल याबाबत जिल्हा परिषदेला काहीही माहिती नसल्याचं शिक्षणाधिकारी संजय जावीर म्हणाले. रणजितसिंह डिसले यांनी अहवाल दिला तर,आम्ही आगामी जून या शैक्षणिक वर्षांपासून विद्यार्थ्यांना यांचा लाभ देण्याचा प्रयत्न करू असेही जावीर यांनी सांगितले.

ऑगस्ट २०२२ मध्ये रणजितसिंह डिसले फुलब्राईट स्कॉलरशिपसाठी अमेरिकेत

ग्लोबल टीचर अवार्ड विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले हे फुलब्राईट स्कॉलरशिपसाठी ऑगस्ट २०२२ मध्ये अमेरिकेला गेले होते. गेल्या वर्षी रणजितसिंह डिसले यांना अमेरिकन सरकारची प्रतिष्ठीत फुलब्राईट स्कॉलरशिप जाहीर झाली होती. या स्कॉलरशिपद्वारे ते सहा महिने अमेरिकेत राहून संशोधन करणार होते.डिसले यांनी सहा महिन्यांची रजा घेतली होती.पण ते साडेतीन महिन्यांत ड्युटीवर रुजू झाले असल्याची माहिती सोलापूर शिक्षण विभागाने दिली आहे.सोलापूर जिल्हा परिषद अंतर्गत २७९५ शाळा आहेत.त्यामधील विद्यार्थ्यांना डिसलेंच्या अमेरिकन शिक्षणाचा फायदा घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार,आणि तसे पत्र देखील रणजितसिंह डिसले यांना देऊ असे शिक्षणाधिकारी संजय जावीर यांनी बोलताना सांगितले.रणजितसिंह डिसले यांची शैक्षणिक रजा ही ३ ऑगस्ट २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ या काळात होती. पण डिसले हे नोव्हेंबर २०२२ मध्येच रुजू झाले असल्याची माहिती समोर आली आहे.सहा महिन्याऐवजी साडेतीन महिन्यात ते कामावर म्हणजेच माढा तालुक्यातील परीतेवाडी या जिल्हा परिषद शाळेत रुजू झाले आहेत.

अंबाबाईच्या दर्शनाला आले, रांगेत असताना कोसळले, अहमदनगरच्या भाविकाला रुग्णालयात नेलं, पण सारं संपलेलं

डिसलेंची चौकशी होल्डवर ठेवली

तत्कालीन शिक्षण अधिकारी किरण लोहार यांनी रणजितसिंह डिसले यांची चौकशी लावली होती.अमेरिकेला जाण्यासाठी डिसले यांनी रजेचा अर्ज घेऊन थेट मुख्यकार्यकारी अधिकारी यांना भेटले होते.यावरून तत्कालीन शिक्षण अधिकारी किरण लोहार यांनी प्रोटोकॉल प्रमाणे रजेचा अर्ज द्या,असा आदेश बजावला होता.किरण लोहार यांनी रणजितसिंह डिसले यांच्याबाबत २०१७ ते २०२० या काळात गैरहजर असल्याची माहिती दिली होती.त्यानंतर चौकशी सुरू झाली होती.या चौकशी बाबत विद्यमान शिक्षणाधिकारी संजय जावीर यांच्याकडे माहिती विचारली असता,त्यांनी चौकशी होल्डवर ठेवली आहे.याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी अधिक माहिती देतील असे सांगून टाळाटाळ केली.

कौतुक करावे तेवढे कमीच! विवाहात चक्क सासरी जाणाऱ्या बहिणीची भर मांडवात ग्रंथतुला

दरम्यान, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइननं रणजितसिंह डिसले यांना यासंदर्भात त्यांची बाजू जाणून घेण्यासाठी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.

Girish Bapat: पुण्यात आले, पण अमरावतीशी नाळ तुटू दिली नाही, गावी ३० एकर शेती, शेतातही रमायचे!

वडील वारले, आईनं शाळेत भात शिजवून दोन्ही पोरांना वाढवलं; एक लेक शिक्षक तर दुसऱ्याला १ कोटी ७० लाखांची फेलोशिप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed