• Mon. Nov 25th, 2024
    पुण्यातील लिंगाण्यावर ट्रेकिंग करताना हार्ट अटॅक, पनवेलमधील ट्रेकरचा करुण अंत

    पुणे : सुट्टीचे दिवस सुरू असल्याने अनेक पर्यटक ट्रेकिंगसाठी बाहेर पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच पुणे आणि राजगड जिल्ह्याच्या हद्दीत असलेल्या लिंगाणा किल्ल्यावर पनवेल येथून आलेल्या ट्रेकर्सचा हृदयविकाराच्या झटक्याने लिंगाणा किल्ल्याजवळ मृत्यू झाला. पनवेल येथील एका ग्रुपमधील हा पर्यटक असल्याची माहिती समोर आली आहे. अजय काळे (वय ६२) असं या पर्यटकाचं नाव आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेवर लिंगाणा हा किल्ला आहे. या किल्ल्यावर जाण्यासाठी पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातून मार्ग आहे. रविवारी पनवेल येथील एक ट्रेकर्सचा ग्रुप या मार्गी लिंगाणा किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी आला होता. ६ ते ७ जणांचा हा ग्रुप होता. त्यात अजय काळे हे सर्वांत ज्येष्ठ आणि अनुभवी ट्रेकर्स होते. ट्रेकिंग करताना त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

    कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! खात्यात जमा PF वर मिळणार भरमसाठ व्याज, EPFO ची घोषणा
    गेल्या ३० ते ३२ वर्षांपासून ते ट्रेकिंग करत होते. त्यांनी आतापर्यंत अनेक गड-किल्ले सर केलेले आहेत. आताचा जो ट्रेकिंगचा ग्रुप आला होता. त्यात ते मार्गदर्शक म्हणून आले होते. ते लिंगाण्यावर जाणार नव्हते. फक्त ते मार्गदर्शन करणार होते. परंतू नियतीला काही वेगळच मान्य होतं. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

    संजय शिरसाटांना खरंच हार्ट अटॅक आला होता का? मुंबईत ७२ व्या मजल्यावरील फ्लॅट कोणाचा?; रुपाली ठोंबरेंचा सवाल

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed